प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मूल- औद्योगीक विकास महामंडळाच्या परिसरात उभ्या असलेल्या प्रकल्पामूळे निर्माण झालेल्या प्रदुषणाच्या समस्येवर तोडगा काढावा व त्याठिकाणी स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दयावा, अशी मागणी परिसरातील मरेगांव, आकापुर, चिमढा, टेकाडी आणि चितेंगाव ग्राम पंचायतीने केली आहे. पाच गावातील सरपंच,उपसरपंच,सदश व प्रतिष्ठित प्रमुख नागरिक यांची एक बैठक CDCC बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली असून एम.आय.डी.सी.प्रकल्प MIDC project प्रमुख यांनी मागणी पूर्ण केली नाही तर गावावर व नागरिकांवर होत असलेल्या अन्याया विरुद्ध लढा देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती आकापूर येथील युवा नेतृत्व संदीप कारमवार यांच्या पुढाकारात आंदोलनाचा पवित्रा उचलल्या जाणार आहे.
धानाची मोठी बाजारपेठ म्हणून ओडखला जाणारा मूल तालुका व्यावसायीक दृष्टयाही अलीकडे प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. परंतू तालुक्यात पाहिजे त्या प्रमाणांत मोठे उद्योग उभे नसून औद्योगीक विकास महामंडळाच्या परिसरात उभ्या असलेल्या प्रकल्पात परप्रांतीय मजुरांना संधी देण्यात येत असल्याने तालुक्यातील हजारो सुशिक्षीत युवक रोजगाराविना आहेत. सक्षम आणि पात्र असलेले अनेक युवक इतरत्र रोजगार करीत असले तरी तालुक्यातील बेरोजगारीची समस्या आजही कयम कायम आहे. काही वर्षापूर्वी कार्यान्वीत झालेल्या मरेगांव लगतच्या शांतीकुंज साॅलव्हंट प्रकल्पात स्थानिकांना रोजगाराची संधी देवु. असे आश्वासन दिले होते, परंतू प्रकल्प व्यवस्थापनाने बोटावर मोजण्या इतक्याच बेरोजगारांना रोजगार देवून अन्य रोजगार मात्र इतर जिल्हयातून आयात केलेल्यांना दिला होता. आज हा प्रकल्प बंद पडल्याने याठिकाणी कार्यरत असलेले रोजगार बेरोजगार झाले आहेत. गडचिरोली मार्गावरील औद्योगीक विकास महामंडळाचे परिसरात सध्यास्थितीत ग्रेटा एनर्जी, राजोरी स्टील आणि पृथ्वी फेरो पाॅवर अँलाय हे तीन प्रकल्प उभे आहेत. या तिनही प्रकल्पात बोटावर मोजण्या इतक्याच स्थानिकांना हमाली व इतर हलक्या दर्जाचा रोजगार देवुन अन्य महत्वाची कामे मात्र जिल्हा व राज्या बाहेरील युवकांकडून केल्या जात आहे. ही कृती स्थानिक बेरोजगारांवर अन्याय करणारी असल्याने कंपनी प्रशासनाच्या या कृतीविरूध्द परिसरातील मरेगांव, आकापुर, चिमढा, टेकाडी आणि चितेंगांव ग्राम पंचायतीने एल्गार पुकारला आहे. तालुक्यातील पाच गांवाच्या हद्दीत येथील प्रकल्प सुरू असून आजपर्यंत एकाही प्रकल्पाने कोणत्याही ग्राम पंचायती मध्यें कराचा भरणा केला नसून सीएसआर निधीमधून विकास कामेही केलेली नाही, याउलट या तिनही प्रकल्पामूळे परिसरातील पाचही गांवात वायु, ध्वनी आणि जल प्रदुषणाची समस्या निर्माण झाली असून परिसरातील नागरीकांशिवाय प्राणी आणि शेतपिकांवर याचा विपरीत परिणाम पडत आहे. विकास आणि रोजगाराच्या उद्देशाने तालुक्यातील औद्योगीक विकास महामंडळाच्या परिसरात उद्योगाची निर्मिती झाली हे जरी खरं असलं तरी आज या प्रकल्पामूळे प्रदुषण आणि बेरोजगाराची समस्या परिसरातील नागरीकांसमोर आ वासुन उभी आहे. हे तेवढचं खरं आहे. त्यामूळे परिरातील आकापुर, मरेगांव, चिमढा, टेकाडी आणि चितेंगाव या पाच ग्राम पंचायतीने निर्माण झालेल्या समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी ठराव पारीत केला आहे. ठरावानुषंगाने पाचही ग्राम पंचायतीच्या पदाधिका-यांनी काॅंग्रेसचे स्थानिक नेते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात अलीकडेच जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेवून सहकार्य करण्याची विनंती केली असून तोडगा काढण्यास प्रशासनास अपयश आल्यास न्याय हक्कासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
समस्यांच्या निराकरणासाठी पालकमंञ्यानी घेतला पुढाकार
औद्योगीक विकास महामंडळाच्या परिसरातील पाच ग्राम पंचायतीच्या ठरावानुषंगाने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी यांना संबंधीत प्रकल्प प्रमुख आणि संबंधीत विभागाच्या अधिका-यांची बैठक आयोजीत करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामूळे येत्या महिण्याभरात ग्राम पंचायतीच्या समस्यांवर तोडगा निघेल. असा विश्वास बाजार समितीचे उपसभापती तथा आकापूर ग्राम पंचायतीचे माजी उपसरपंच संदीप कारमवार यांनी व्यक्त केला असून पाचही गावातील नागरिकांना न्याय मिळाला नाही तर आंदोलन पुकारण्यात येईल असा इशाराही संघर्ष समितीने दिला आहे.
