गडचांदूर :- गडचांदूर शहराची लोकसंख्या ४५ हजारांच्या जवळपास असून याठिकाणी अंदाजे २० गणेश व १५ देवीचे सार्वजनिक मंडळे आहे.गणेश व देवी विसर्जन जवळच्या अंमलनाला धरणात केले जातात.सध्या अमलनाला धरणावर सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे.याच पार्श्वभूमीवर त्याठिकाणी गणेश व देवी विसर्जन घाट तयार करण्यात यावा,अशी मागणी येथील गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार बाळु धानोरकर व आमदार सुभाष धोटे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
गडचांदूर शहराला लागून आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिमेंट उद्योग आहे.अमलनाला सौंदर्यीकरणाच्या कामासाठी करोडोंचा निधी मंजूर झाला आहे.या अनुषंगाने गणपती व देवी विसर्जन घाट होण्यास कोणतीही आर्थिक अडचण नसल्याचे लक्षात घेऊन आता विसर्जन घाटाची मागणी जोर धरू लागली आहे.याबाबत सकारात्मक पाऊले उचलण्याचे आश्वासन लोकप्रतनिधींकडून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले असून विसर्जन घाट बनणार असल्याची आशा बळावली आहे.निवेदन देताना अक्षय मेंढी, नगरसेवक अरविंद मेश्राम,केशव डोहे, मनोज भोजेकर,दत्तात्रय बोढाले,अमीत पारखी, उमेश भोजेकर,कुणाल पारखी, मयूर बु-हाण, सुयोग कोंगरे आदींची उपस्थिती होती.
