प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - शेतकऱ्यांच्या हक्काची व सर्व सामान्य गोर गरिब जनतेला मदत करणाऱ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष तथा माजी जि. प.अध्यक्ष संतोषशिंह रावत यांनी अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्या बरोबर बँकेच्या विकासाच्या दृष्टीने धोरणात्मक बदल करून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय हाती घेतले तेंव्हापासूनच संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील कँसरसारख्या दुर्धर आजारांनी त्रस्त असलेल्या गंभीर रूग्णांना, शेतकरी कल्याण निधी मधून उपचारासाठी आर्थिक मदत देण्याचे काम करीत आहे. आतापर्यंत अनेक कॅन्सरग्रस्त व दुर्धर आजार असलेल्या रुग्णांना बँकेचा आधार देण्याचे काम बँक करीत असून बँकेच्या मदतीने अनेक रुग्ण बरे झाले आहेत. मुल येथील कॅन्सरग्रस्त शेतकरी महिला रुग्ण सौ.प्रेमीला मुर्लीधर शेंडे यांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन रुग्ण महिलेला बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत व सोबत माजी जी.प.सदस्य प्रा.रामभाऊ महाडोळे यांनी आर्थिक मदतीचा चेक दिला. आणि दिवाळीच्या शुभेच्छा देत तुम्ही नक्कीच बरे व्हाल काळजी करु नका असा धीरही संतोष रावत यांनी दिला.
याप्रसंगी तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनशाम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष तथा बाजार समिती संचालक राकेश रत्नवार, कांग्रेस शहर अध्यक्ष सुनील शेरकी, माजी नगराध्यक्ष वासुदेव लोनबले, नगर सेविका ललिता फुलझेले, ओबीसी कांग्रेस सेलचे तालुका अध्यक्ष गुरुदास चौधरी, माजी नगर सेवक गुरु गुरनुले, सामाजिक कार्यकर्ते सुरेश फुलझेले, यांचेसह प्रेमीला शेंडे यांचे कुटुंबीय आणि वार्डातील ग्रामस्थ उपस्थित होते. ऐन दिवाळीच्या सणाच्या दिवशी रुग्णांच्या घरी जाऊन ३० हजार रुपये आर्थिक मदतीचा चेक दिल्याने शेतकरी रुग्णांच्या घरी लक्षमी आल्याचा आनंद शेंडे कुटुंबियांच्या चेहऱ्यावर दिसून आला. आणि शेंडे कुटुंबीयांनी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत व उपस्थितांचे त्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले.
