प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - दिनांक 26/11/2021ला मोहसिनभाई जव्हेरी कन्या विद्यालय, बल्लारपूर येथे Constitution day " संविधान दिवस" साजरा करण्यात आला, त्या निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेच्या प्राचार्या सौ कोतकेलवार यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पकार यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. सौ.आमटे व सौ.किसान यांनी संविधान बद्दल सविस्तर माहिती दिली, तसेच उपमुख्याध्यापिका सौ.ढेगळे यांनी मार्गदर्शनपर भाषण केले कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.कोतकेलवार यांनी संविधान दिनाच्या शुभेच्छा देऊन अधयक्षिय भाषन केले. विद्यार्थी व शिक्षिकांनी विविध स्पर्धा मधे उत्स्फूर्त सहभाग घेतला. निबंध स्पर्धा 1 कु.सना खान, 2 कु चित्ररेखा गोंधळी, 3 कु तम्मन्ना खान, भाषण स्पर्धा 1 कु.अनुष्का ठाकुर, 2 कु.अस्मिता चौव्हाण 3 कु.नैना निषाद पोस्टर स्पर्धा 1कु.भुमिका कैथवास 2कु.जुबी पठाण तसेच स.शिक्षिका कु.नजमा अहमद शेख यांनी सुंदर पोस्टर बनवले. संचालन व आभार प्रदर्शन कु.ज्योती ताजने यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेच्या पर्यवेक्षिका रच्चावार,मिडल इन्चार्ज सौ.बोप्पनवार कु.विमल पून सर्व शिक्षिका व इतर कर्मचारी वर्ग यांनी सहकार्य केले व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
