चंद्रपूर, दि. 8 नोव्हेंबर : जिल्ह्यात सोमवारी (दि.8) एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. गत 24 तासात जिल्ह्यात एकाने कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर सोमवारी मृत्यू संख्या शुन्यावर आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 819 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 267 झाली आहे. सध्या 10 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 38 हजार 589 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 48 हजार 381 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1542 बाधितांचे मृत्यू झाले आहे.
मागील 4 दिवसापासून शहरात एकही नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली नाही, चंद्रपूर शहरात आजपर्यंत एकूण 25 हजार 674 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली होती त्यामधून एकूण 25 हजार 235 नागरिकांनी कोरोनावर मात केली, मात्र 437 नागरिकांनी या कोरोना महामारीत आपला जीव गमाविला.
आज एकूण 236 चाचण्या करण्यात आल्या असून यामध्ये एकही बाधित आढळला नाही.
Chandrapur city corona free
प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. Corona virus

