चंद्रपूर - 26 नोव्हेंबर 2008 राज्याची राजधानी mumbai terrorist attack मुंबईत सशस्त्र दहशतवादी हल्ला करण्यात आला होता, अनेकांनी या हल्ल्यात आपले प्राण गमाविले, आजही ती रात्र आठवली की डोळ्यासमोर वेदनादायी दृष्य नजरेस पडते असे उदगार त्या दिवशी कर्तव्यावर असणारे पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांनी काढले.
मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 ला दहशतवाद्यांनी भयंकर हल्ला केला होता. या घटनेत 166 जणांचा मृत्यू झाला होता. Ajmal Kasab अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले होते. त्याला 2012 च्या नोव्हेंबरमध्येच फाशी देण्यात आली. कसाबला फाशी दिल्यानंतर या हल्ल्याचा एक अध्याय संपला. परंतु, हल्ल्याने ज्यांना कधीही भरुन न निघणा-या जखमा दिल्या, त्यांना न्याय मिळाला का? याचे उत्तर नाही असेच आहे. या हल्ल्याचा कट रचणारे आजही मोकाट आहेत. त्यावर कळस म्हणजे पाकिस्तानने नुकतेच हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईदला नजरकैदेतून मोकाट सोडले आहे.
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी यापूर्वी दोनदा प्रयत्न केले होते. एकदा त्याची बोट दगडाला धडकली आणि तो बुडताना वाचले. या हल्ल्यात सामील असलेल्या 10 दहशतवाद्यांची नावे आहेत - अजमल अमीर, अबू इस्माईल डेरा, हाफीज अर्शद, बाबर इम्रान, जावेद, शोएब, नझीर अहमद, नसीर, अब्दुल रहमान, फहदुल्ला आणि अजमल कसाब. यामध्ये 9 दहशतवादी मारले गेले आणि फक्त कसाब जिवंत पकडला गेला.
रात्री 9.30 च्या सुमारास दोन दहशतवादी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनलच्या मुख्य हॉलमध्ये घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. दोघांच्या हातात एके 47 रायफल होत्या आणि पंधरा मिनिटांत त्यांनी 58 लोकांना ठार आणि 109 जण जखमी केले.
सलग 3 दिवस मुंबई अक्षरशः या हल्ल्याने हादरून गेली होती, मात्र पोलिसांनी न डगमगता हल्लेखोरांना प्रत्युत्तर दिले होते.
त्यावेळी चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये स्वप्नील धुळे हे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते, रात्री 9 वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशनच्या फोन वाजला, दुसरीकडून मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला आपली चमू सोबत घेत तात्काळ बंदोबस्त लावा अश्या सूचना धुळे यांना मिळाल्या, मात्र दहशतवादी यांच्याजवळ आटोमॅटिक रायफल, बॉम्ब गोळा आणि पोलिसांजवळ मोजता येणाऱ्या बंदुकीच्या गोळ्या होत्या, कसलीही पर्वा न करता स्वप्नील धुळे आपली चमू सोबत घेत बंदोबस्ताला लागले, काही वेळात वायरलेस वर सूचना मिळाली छत्रपती शिवाजी टर्मिनल येथे गोळीबार होत असल्याची, त्या दिशेने स्वप्नील धुळे आपल्या चमुसह दाखल झाले, मात्र पुढील दृश्य बघून त्यांचं मन विचलित झाले, त्याठिकाणी अनेक मृतदेह पडलेले होते, त्याठिकाणी जे नागरिक बचावले त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्याचे काम स्वप्नील धुळे यांनी केले.
यावेळी बॉम्ब शोधक व नाशक पथकाने 3 व 16 जिवंत हॅन्ड ग्रेनेड्स निकामी केले, स्वप्नील धुळे यांच्या चमूने सलग 3 दिवस स्वतःला झोकून देत उल्लेखनीय कामगिरी केली असली तरी आजही त्या वेदना त्यांच्या मनाला होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
आज स्वप्नील धुळे चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे.
अविरत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात.
या हल्ल्यादरम्यान हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक पोलीस कर्मचारी शहीद झाले. दहा दहशतवाद्यांपैकी एका दहशतवाद्याला जिंवत पकडण्यात पोलिसांना यश आलं. हा दहशतवादी म्हणजे अजमल आमीर कसाब. तुकाराम ओंबळे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या अंगावर गोळ्या झेलून कसाबला जिवंत पकडलं. परंतु तुकाराम ओंबळे शहीद झाले. त्यांच्यामुळेच अजमल कसाबला जिवंत पकडता आलं आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आणण्यास मदत झाली.
