चंद्रपुर : राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आज (दि.२६) नोव्हेंबरला संविधान दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी संविधानाच्या ऊद्देशीकेचे वाचन करण्यात आले. Constitution day chandrapur
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे या देशातील सर्व नागरीकांना सामाजिक, आर्थीक, राजकीय, न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता दिली गेली आहे. तसेच व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता टीकविण्यासाठी बंधुता हा फार मोठा विचार बाबासाहेबांनी मांडलेला आहे. त्यामुळेच आपला देश प्रगतीपथावर आहे, असे मत ओबीसी महासंघाचे अध्यक्ष नितिन कुकडे यांनी यावेळी मांडले.
यावेळी National OBC Federation राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, जिल्हा सचिव विजय मालेकर यांनीही संविधानाविषयी मनोगत व्यक्त केले. तसेच मंजुळा डुडुरे, डॉ. प्रविण चटप, शरद कूत्तरमारे, प्रशांत चहारे, जोत्सना लालसरे, रवि जोगी, संजय रंगारी, किशोर धनविजय, पाटील, शितल पाटील, शारदा नवघरे, गेडाम, चामाटे, मोडक, पिंपळकर, थेटे, वासेकर, खोके, गाडगे, राहुल देशमुख, मनिष यादव, सोणी, अमीत अत्तरकर, सुनिल मुसळे, व ईतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
