चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील नागरिकांनी घरातील कचरा झेंडीत अथवा उघड्यावर टाकू नका. तसे आढळून आल्यास संबंधित नागरिकांवर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मनपाच्या स्वच्छता विभागातर्फे फिरणाऱ्या घंटागाडीमध्येच कचरा टाकावा व शहर स्वच्छ राखण्यात प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
Chandrapur mahanagarpalika
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत आयुक्त commissioner राजेश मोहिते व अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी आरोग्य आणि स्वच्छता विभागाच्या संयुक्त बैठकीत आढावा घेण्यात आला. नागरिक घंटागाडीमध्ये कचरा न टाकता बाहेर रस्त्यावर किंवा इतरत्र टाकतात. ज्यामुळे दुर्गंधी निर्माण होते व रोगराई पसरण्याचा धोका देखील बळावतो. सदर बाबीचे गांभीर्य लक्षात घेता मनपा आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांनी कचरा निर्मूलनावर लक्ष देण्याचे आदेश दिले. कचरा निष्पादनाच्या कामाचे पर्यवेक्षण करण्यासाठी महापालिकेद्वारे शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे CCTV camera लावण्यात आले असून, स्वच्छता दूत देखील नेमण्यात आलेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी कचरा घंटागाडीतच टाकावा व दंडात्मक fine कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात आलेले आहे.

विशेष म्हणजे चंद्रपूर शहरात मागील अनेक दिवसांपासून डेंग्यू ची Dengue साथ सुरू आहे मात्र त्यावर गांभीर्य घेण्याचं काम पालिकेने केले नाही आणि आता नागरिकांना कचरा उघड्यावर टाकल्यास कायदेशीर दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला, पालिकेचा हा उपक्रम चांगला मात्र साथीचे आजार जेव्हा सुरू होतात त्यावेळी हीच पालिका अज्ञभिन असते.
आज शहरातील रस्त्यांनी खड्ड्यात जीव सोडला आहे, त्या खड्ड्यात पालिका भरन भरण्याचे काम करीत आहे त्यामुळे रस्त्यावर उडणारा धूर नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करीत आहे.