चंद्रपुर :- राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र मागील सहा वर्षापासून मुस्लिम आरक्षणासाठी विविध
आंदोलन आणि निवेदन देत राज्य सरकारचे लक्ष वेधत आहे. जून २०१४ ला आघाडी सरकार ने मा. राज्यपालांच्या अध्यादेशाव्दारे मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण घोषीत केले होते. विशेष म्हणजे न्यायीक प्रक्रियेत मराठा समाजाचे आरक्षण टिकले नाही. परंतु मुस्लिम समाजाला शैक्षणिक आरक्षण बहाल करून नौकरी संदर्भात अधिक माहिती पुरविण्याची सुचना देवून थांबविण्यात आले. यातून हे निदर्शनास येते की मुस्लिम समाजाची आरक्षणाची मागणी संवैधानिक असून धार्मिक नाही. परंतु त्यावेळेस सत्तेवर असलेल्या आघाडी सरकारने या अध्यादेशाला लॉलीपॉप ठरविले आणि त्यानंतर सत्तेवर आलेल्या युती सरकारने याला निरस्त होऊ दिले. यामूळे राज्यात हजारो मुस्लिम युवकांचे शैक्षणिक आणि लाखो परिवारांचे आर्थिक व सामाजिक नूकसान झाले.
National Muslim Rights Struggle Committee
राज्य सरकार आणि केंद्र सरकारने नेमलेल्या विविध आयोगाने आणि अभ्यास गटाने मुस्लिम समाजाला आरक्षणाची गरज असल्याचे स्पष्टपणे नमूद केलेले आहेत.
राज्यात दोन वर्षापासून शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. परंतु मुस्लिम आरक्षणा संदर्भात यांची भूमिका अजूनही अस्पष्ट असल्याचे मुस्लिम समाजाच्या निदर्शनात येत आहे. केवळ मतांसाठी मुस्लिम समाजाला पाहून त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याकरिता ध्येय धारण न आखणे हा अन्याय आहे. Muslim reservation
7 डिसेंबर ला नागपूर येथे विधानसभा सत्राची सुरुवात होणार आहे, या अधिवेशनात मुस्लिम समाजाला शैक्षणिक व नोकरीत आरक्षण बहाल करण्यात आले नाही तर राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समिती तर्फे संपुर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा समितीने दिला आहे.
समितीचे महासचिव फिरोजखान पठाण यांनी सरकारला इशारा देत म्हटले की मुस्लिम समाज शैक्षणिक व नोकरीत आरक्षणाची मागणी करीत आहे, आरक्षणाची मागणी करण्याचा सर्वाना संविधानाने अधिकार दिला आहे, आम्ही भारत देशात राहतो पाकिस्तानात नाही.
आम्हाला आरक्षण द्या अथवा भविष्यात होणाऱ्या सर्व निवडणुकीत मुस्लिम समाज सत्ताधाऱ्यांना निवडणुकीत सहकार्य करणार नाही, जो आम्हाला आरक्षण देणार त्या पक्षाचे आम्ही समर्थन करू अन्यथा नोटा चा पर्याय खुला आहे.
समाजाची आर्थिक,शैक्षणिक आणि सामाजिक स्थिती फारच कठीण आणि विदारक होत असल्याने राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र संपूर्ण राज्यात यल्गार करून तिव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहे. आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष हाजी सय्यद अनवर अली, केंद्रीय संघटक मुश्ताक कुरेशी उपस्थित होते.
