प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - दिनांक 22.10.21 रोजी एकदन्त लॉन, बल्लारपुर इथे बल्लारपुर बिज़नेस असोसिएशन तर्फे सर्व व्यापार्या साठी कोजागिरी चे आयोजन करण्यात आले होते, ज्यात 100 च्या वर व्यापारी सहभागी झालेले होते. ह्या कार्यक्रमात चंद्रपुर जिल्हा व्यापारी महासंघाला ही आमंत्रीत केले गेले होते.ज्यात अध्यक्ष सदानंद खत्री, नारायण तोषनीवाल यांची उपस्थित होती. सुरवातीला बल्लारपुर बिज़नेस असोसिएशन Ballarpur Business Association चे अध्यक्ष श्री नरेश मुंदडा यानि प्रस्ताविक करुंन कार्यक्रम ची रुपरेषा उपस्थिताना समोर मांडली. चंद्रपुर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष श्री सदानंद खत्री यांनी व्यापारी एकता व मजबूती बद्दल मार्गदशन केले, तसेच कोरोना काळात सावधानिने कसा व्यापार करावा याबद्दल ही माहिती सर्व उपस्थितांना दिली.सर्व उपस्थित व्यापार्यानी लसी चे दोन डोज घेतल्याबद्दल त्यांचे अभिनन्दन ही केले.अशीच काळजी पुढेही घेण्याची विनंती खत्रिजी ने केली. चंद्रपुर जिल्यातील सर्व व्यापार्याची जिल्हास्तरीय संघटना बनवुन व्यापार्या चे हित जोपासंन्या साठी परिश्रम घेतल्या बद्दल चंद्रपुर जिल्हा व्यापारी महासंघा चे अध्यक्ष श्री सदानंद खत्री यांचा बल्लारपुर बिज़नेस असोसिएशन तर्फे शाल,श्रीफल व भेट वस्तु देऊन सत्कार करण्यात आला. Merchant Guidance Camp ह्या वेळी बल्लारपुर बिज़नेस असोसिएशन चे प्रणेता श्री भगवानदास गिदवानी, अध्यक्ष -श्री नरेश मुंदड़ा, कार्याध्यक्ष -श्री अर्जुन नाथानी, महासचिव -श्री अरुण वाघमारे,सचिव श्री रवि फूलझेले, सदस्य -श्री हरीश गीदवानी व पूर्ण कार्यकारिणी उपस्तित होते.. शेवटी कोजागिरी च्या व जेवणाचा आस्वाद घेवून कोजागिरी चा आनंद द्विगुनीत करण्यात आला. हा कार्यक्रम सफल करण्यासाठी संघठन चे अमित गिडवानी, जगदीश मुंदडा, सुनील मालू, बन्सी चांदे या पदाधिकारी यानि बरेच परिश्रम घेतले.
