चंद्रपूर - चंद्रपूर शहरातील विठ्ठल व्यायाम शाळेच्या वतीने स्व.दादाजी येरेवार यांच्या स्मूती प्रित्यर्थ रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरात 57 रक्तदात्यांनी रक्तदान केले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समिती Maharashtra Legislative Public Accounts Committee प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते त्यांनी विठ्ठल व्यायाम शाळेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करून व्यायाम शाळेच्या पादाधिकाऱ्यांचा व रक्तदात्यांचा उत्साह वाढविला. तर असा रक्तदानाचा उपक्रम विठ्ठल व्यायाम शाळेच्या वतीने पहिल्यांदा राबविण्यात आला असून अशा प्रकारचे रक्तदान शिबिर blood donation दरवर्षी आयोजित करण्याचा संकल्प असल्याचे व्यायाम शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखविला विशेष म्हणजे या रक्तदान शिबिरात स्त्रियांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष दिलीप रामेडवार, विठ्ठल मंदिर देवस्थानचे अध्यक्ष बिंदूजी बडकेलवार, भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी प्रवीण बडकेलवार,सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी अभय बडकेलवार,नगरसेवक प्रशांत दानव,विशाल निंबाळकर, नगरसेविका सिमा रामेडवार,संगीता खांडेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सदर कार्यक्रम विठ्ठल व्यायाम शाळेचे सदस्य सचिन कोतपल्लीवार यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनंजय येरेवार,छोटू बडकेलवार,निलेश रामेडवार,राहुल अंबिरवार,निलेश दौडकर,वैभव रामेडवार,राकेश पडगेलवार,अमोल कटलावार,गुड्डू दळने,कुणाल ताजने,गणेश निखाडे,बंटी दुर्सेलवार,बंटी खरवडे,प्रणय इंगोले,वैभव बोबडे,मयूर रामेडवार,सचिन बनकर,सोनू डाखोरे,प्रसाद शेरेकार, सुजल बोरीवार,नयन डोईफोडे,जय मेडलवार, दिवाकर बनकर,एकनाथ जिझीलवार,अमोल पालेकर, सतीश अहिर,राहुल गौड,नीरज मौसमवार यांनी अथक परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे संचालन अल्का जिझीलवार यांनी केले.
