चंद्रपूर - विदर्भातील युवकांसाठी एक स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध व्हावे , युवकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कुठल्याही राजकीय पक्षाच्या मदतीच्या पलीकडे जाऊन मदत करता यावी , सर्वसामान्य युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पक्षाच्या युवकांनी एकत्र येऊन विदर्भ युवा फाउंडेशन ची Vidarbha Youth Foundation स्थापना केली आणि त्याची मुहुर्तमेढ महात्माजीं गांधी mahatma gandhi यांच्या जयंतीच्या दिनी 2 ऑक्टोबर ला युवा संमेलन 2021 घेऊन करण्यात आली, आणि संमेलनात समाजात विशेष योगदान देणाऱ्या श्रुती लोणारे बल्लारपूर , रूपल उराडे चंद्रपूर, आरती गँगोत्री चंद्रपूर आणि अनिकेत दुर्गे aniket durge भंगाराम तळोधी या चंद्रपूर जिल्ह्यातील युवा ऊर्जास्त्रोतांचा सन्मान करण्यात आला superhero chandrapur , याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा. निलेशजी गौंड तहसीलदार चंद्रपूर आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. राजेशजी पेचे सर ( HOD government engineering collage chandrapur ) उपस्थित होते , तसेच संस्थापक सदस्य राजीव कक्कड , सचिन कत्याल, मेघा सुरेश रामगुंडे,नितीन भटारकर , सुरज घोंगे, यश दत्तात्रय, विनय धोबे उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेघा सुरेश रामगुंडे यांनी विदर्भ युवा फॉउंडेशन ची भुमिका काय असणार आहे आणि त्या मागचा उद्देश्य बद्दल माहिती दिली.तर संचलन देवेन्द्र मंडलवार यांनी केले, विदर्भ युवा फाउंडेशन हे चंद्रपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपुर्ण विदर्भातील ग्रामीण भागातील युवकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारे फाऊंडेशन बनेल असा विश्वास यावेळी उपस्थित मार्गदर्शकांनी व्यक्त केला.