चंद्रपूर - जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान, चंद्रपूर च्या वतीने जेष्ठ नागिरक Senior citizen सेवा व सुश्रुषा कार्यक्रम अंतर्गत मोरवा ता. जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक जेष्ठ नागरिक दिन निमित्याने प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात गावचे उपसरपंच मा. पिदूरकर साहेब, प्रमुख मार्गदर्शक मा. धनंजय तावाडे Superstition (अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सचिव), प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक डॉ. खुशबू मॅडम, ग्राम पंचायत सदस्य मा. सुकेशनी डोर्लीकर मॅडम, ज्येष्ठ नागरिक तथा उपक्रम केंद्राचे कॅप्टन दुरुटकर आजी, शांता आजी , गावातील CRP यांची उपस्थिती होती. दरम्यान गावातील उपसरपंच साहेबांनी केक आणून जेष्ठ नागरिकांचा हस्ते केक cake कापल्या गेले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा. धनंजय तावाडे साहेबांनी वयोवृद्धांना मार्गदर्शन केले. त्यात जेष्ठ नगरीकांचा जीवनातील प्रवास, नैराश्य, उदासीनता ,स्मृतिभ्रंश यावर मार्गदर्शन केले. नेहमी आनंदी जीवन जगण्यासाठी प्रयन्त करा असे सांगितले तसेच अंधश्रद्धामुळे कशी फसवणूक Cheating होते ते प्रयोग करून वयोवृद्धांना दाखविले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक गाव स्वयं सेवक संगिता डोर्लीकर मॅडम यांनी केले तर संचालन व आभार मनोज सोदारी यांनी केले. या कार्यक्रमात वयोवृद्धांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.