प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - खेडी येथील पर्यावरण प्रेमी Environmentalist एक ध्येयवेडा माणूस राजू कटकमवार यांनी नेहमीच राष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून गेल्या आठ वर्षांपासून शासनाची कुठलीही आर्थिक मदत न घेता स्वखर्चाने गावातील मुख्य प्रवेश द्वाराच्या दोन्ही बाजूला अनेक जातीच्या वृक्षाची लागवड करुन वर्षभर त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारून हिवाळा,उन्हाळा,पावसाळा या तिन्ही वृतुमध्ये पाणी टाकून,सभोवताल झाडाला कुंपण करून आज पर्यंत दिडशेच्या वर वृक्ष tree जगविले आहे. आजही लावलेले सर्व वृक्ष मोठ्या अभिमानाने आणि डौलाने उभे आहेत. वृक्षारोपंन करणे, संगोपन करणे, हे कार्य राजू कटकमवार हे आजही करीत असल्याने ग्राम पांच्यायत खेडी, पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या Institute for Environmental Conservation and Human Development वतीने पर्यावरण प्रेमी ध्येयवेड्या राजू कटकमवार यांचा सत्कारही करण्यात आला आहे. आजही २ आकटोम्बर गांधी जयंती gandhi jayanti निमित्ताने तलाठी कार्यालय समोर वृक्ष लागवड केली. याप्रसंगी पोलीस पाटील कृपाल दुधे, नितेश येनुगवार, सुशील एडमलवार, राज कटकमवार, संकेत वदमवार, आर्यन एलट्टीवार, कार्तिक पाडेवार, सौगंध मोहूर्ले, संघर्ष मोहूर्ले आदी युवक उपस्थित होते. २ आकटोम्बर हा दिवस पर्यावरण प्रेमी श्री. राजाभाऊ कटकमवार यांचाही वाढदिवस असल्याने हा योगायोग वृक्ष लागवड करुन साजरा करण्यात आला.