प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - तहसील मधील मौजा विसापूर येथे महात्मा गांधी यांच्या जयंती पासून महाराष्ट्र शासनाच्या शेतकऱ्यांना farmer मोफत घरपोच 7/12 वाटपाचे अभियानाची सुरुवात तहसील कार्यालय बल्लारपूर कडून करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. उपविभागीय अधिकारी डॉ दीप्ती सुर्यवंशी dipti suryawanshi होते. तर प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद सदस्य श्री ad. हरीश गेडाम, पंचायत समिती सदस्य श्री गोविंदा भाऊ पोडे ,श्रीमती विद्या गेडाम यांची होती. तसेच विसापूर येथील सरपंच सौ वर्षा ताई कुळमेथे आणि उपसरपंच श्री अनकेशवर मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी तेथील शेतकरी यांना पाहुण्यांचे हस्ते मोफत 7/12 चे वितरण करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ दीप्ती सुर्यवंशी यांनी सांगितले की टप्प्याटप्याने तालुक्यातील सर्व गावातील शेतकर्यांना मोफत डिजिटल गाव नमुना Digital Village Sample 7/12 वाटप करण्यात येईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय राईंचवार तहसीलदार बल्लारपूर यांनी केले. संचालन श्री अजय मेकलवार लिपिक, तर आभार प्रदर्शन श्री सतीश साळवे नायब तहसीलदार यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी श्री रोहीत चव्हाण तलाठी आणि सर्व तहसील कार्यालयाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.