प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर :- शैक्षणिक वर्तुळात नेहमी काही कुठल्या ना कुठल्या कारणाने सतत वादग्रस्त ठरत आहेत. बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या Ballarpur Institute of Technology Engineering College एका प्राध्यापिकेनी बीआयटी अभियांत्रिकी महावद्यालयातील प्राचार्य आणि पॉलिटेक्निक चे प्राचार्य या दोघांनी विनयभंग molested आणि मानसिक छळ केल्याचा आरोप या पीडित प्राध्यापक महिलेने चंद्रपूर प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये केला होता.
या महिला प्राध्यापिकेनी केलेले संपूर्ण आरोप गंभीर असून, यासंदर्भात तिने बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र, पोलिसांनी कुठलीही दखल न घेतल्याने त्या महिलेने यासंबंधी जिल्हा पोलिस अधीक्षकांना भेट देऊन सदर प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. असल्याचे सांगण्यात आले. हि महिला प्राध्यापक बीआयटी मध्ये मागील सहा वर्षांपासून मायनिंग विभाग mining म्हणून कार्यरत आहेत. आपल्यावर झालेल्या अन्यायाबद्दल सदर महिलेने सांगितले की ६ ऑक्टोंबर रोजी आपल्या कक्षात बसून असतांना प्राचार्याच्या दर्जाच्या दोन्ही प्राध्यापकांनी कक्षात प्रवेश केला आणि अत्यंत जोरजोरात घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. आणि महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांना माझ्याविषयी भडकावण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार सहन न झाल्याने मी कक्षाबाहेर जाण्याचा प्रयत्न केला. याचवेळी एका प्राध्यापकाने घट्ट हात पकडला. यादरम्यान माझ्या हाताला इजा झाली. तर दुसर्या एका प्राध्यापकाने ड्रेस ओढण्याचा प्रयत्न केला. मी कशीबशी त्याच्या तावडीतून सुटून थेट संस्थाध्यक्षाकडे गेली मात्र, संस्था अध्यक्षाने भेट देण्याचे टाळले. अखेर पोलिसात जाऊन याबाबत मी तक्रार दिली. मात्र तोपर्यंत या महाविद्यालयाकडून पोलिसांवर दबाव आल्याने पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. असे विविध आरोप या महिलेने केले आहेत. यानंतरही माझ्या छळ सुरूच असल्याचे प्राध्यापक महिलेने सांगितले. फोन करून बिहार झारखंड या विद्यार्थ्यांना फोन नंबर माझ्याकडून मागितले व त्याच्याकडून रिव्हॉल्व्हर, कट्टा बोलवायचे आहे. असे सांगून तुला मारण्यासाठी कट रचला जात असल्याची धमकी या प्राध्यापकांनी दिली असल्याचे तिने सांगितले, सदर महाविद्यालयात परराज्यातील विद्यार्थ्यांच्या हातून शत्रे बोलावले जात, असल्याचा धक्कादायक आरोप या महिला प्रध्यापिकेकडून करण्यात आला आहेत. महाविद्यालयात काम करीत असताना संबंधित या दोन्ही प्राध्यापक माझ्यावर सातत्याने टिप्पणी आणि अँसिड acid टाकून मारण्याची धमकी दिली असल्याचेही आरोप या महिला प्राध्यापक महिलेने केले आहेत.
याबाबत तक्रार मी बल्लारपूर पोलिस स्थानकात केली आहे. मात्र, कुठलीही कारवाई न झाल्याने अखेर जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली. संबंधितांवर कारवाई करावी. त्यांना महाविद्यालयातून निलंबित करण्यात यावे. अशी मागणीही या वेळी सदर प्राध्यापक महिलेच्या वतीने करण्यात आली आहे.
महिला प्राध्यापकांच्या आरोपावर बीआयटी तर्फे संस्थाध्यक्ष व प्राचार्यांनी आपली बाजू मांडली आहे, सदर महिला प्राध्यापकांचे आरोप हे खोटे असून आम्हाला बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
आमच्या संस्थेद्वारा संचालित बल्लारपूर इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयातील एका घटनेचा विपर्यास करून काही विघ्नसंतोषी लोकांच्या चिथावणीवरून आणि सक्रीय सहभागाने प्रसार माध्यमांमार्फत मागील काही दिवसांपासून संस्थेच्या आणि प्राचार्याच्या बदनामीचे सत्र सुरू आहे.
वास्तविक आमच्या समोर आलेली घटना अशी की दि. ०७.१०.२०२१ रोजी बीआयटी च्या संचालकांकडे एका प्राध्यापिकने एक अर्ज केला ज्यात तिचे गाऱ्हाणे होते की दि. ०६.१०.२०२१ रोजी अभियांत्रिकी कॉलेज आणि पॉलिटेक्निकच्या प्राचार्यांनी अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसमोर मोठमोठ्याने विचारपूस केली आणि अपमान केला तसेच ती विद्यार्थ्यांना भडकवित असल्याचा आरोप केला आणि हे सर्व तिच्या आणि प्राचार्याच्या पदाला शोभेनासे होते. त्यावेळी उपस्थित इतर कर्मचाऱ्यांना विचारपूस केली असता त्यांनी देखील वरप्रमाणे घटना घडल्याबाबत दुजोरा दिला. याबाबत दोन्ही प्राचार्यांनी देखील खुलासा दिला. सर्वांचेच म्हणणे मिळतेजुळते होते. झालेल्या घटनेबाबत दोन्ही प्राचार्यांनी दिलगिरी व्यक्त केली. सदर प्राध्यापिकेच्या विनंतीवरून आम्ही त्या अर्जाची प्रत बल्लारशहा पोलिस स्टेशनला पाठविली.
सदर प्राध्यापिकेला कोणीही स्पर्श केल्याबाबत किंवा अश्लील शब्द वापरल्याबाबत आमच्याकडे कोणतीही तक्रार आली नाही. तशी तक्रार असल्यास कामाच्या ठिकाणावर महिलांच्या छळवणुकीबाबतच्या समितीमार्फत निश्चित चौकशी करण्यात येईल.
परंतु सदर प्राध्यापिकेने आपल्या तक्रारींचे स्वरूप आणि त्यात वेळोवेळी होणाऱ्या सुधारणा आणि गांभीर्य वाढविण्याचा प्रयत्न यावरून तिने केलेल्या आरोपांच्या सत्यतेबाबत शंका येण्यास भरपूर वाव असून काही महाभागांच्या चिथावणीकरून हा प्रकार होत असल्याचे जाणवते. चौकशीअंती सत्य बाहेर येईलच.
कालपासून व्हायरल होत असलेल्या ऑडियो आणि व्हिडिओ च्या प्रस्तुतीकरणावरून ते बनावटी असावेत असे लक्षात येते की ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्याबाबत देखील पोलिसांनी चौकशी करावी आणि संस्थेची बदनामी करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी बीआयटी महाविद्यालयाच्या संचालकांनी केली आहे.
