प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मूल - चंद्रपूर आर्णी लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी नुकताच मुल येथे दौऱ्याच्या निमित्ताने मुलच्या वार्ड नंबर १६ येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भेटी दिल्या असता भेटीचे औचित्य साधून वार्ड नंबर १६ च्या नागरिकातर्फे धडाडीचा युवा कार्यकर्ता अतुल गोवर्धन यांनी जिल्ह्याचे कांग्रेस नेते व खासदार बाळूभाऊ धानोरकर व चंद्रपूर जिल्हा CDCC बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचा शाल श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन नागरीकांच्या वतीने भावपूर्ण सत्कार केला. यानिमित्य वंचित बहुजन आघाडीचा Vanchit Bahujan Aghadi सक्रिय कार्यकर्ता सुजित खोब्रागडे यांनी कांग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रसंगी नागरिकांनी वार्डातील समशा डी.पी.रोडचे सिमेंटी करणं, झोपडपट्टी धारकांना घराचे पट्टे, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, काही ठिकाणी विद्युत पोल आवशक असल्याचे लक्षात आणून दिले असता आपल्या समशा त्वरित मार्गी लावण्यात येईल असे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी नागरिकांना सांगितले. तसेच तालुका कराटे असोसिएशनच्या वतीने सन्माननीय खासदार कराटे चषक आयोजित करण्यासाठी निवेदन देण्यात आले. या खेळात ५०० खेळाडूंचा समावेश राहील असे सांगितले. याप्रसंगी वंचीत बहुजन आघाडीचा सक्रिय कार्यकर्ता सुजित खोब्रागडे यांनी कांग्रेस पक्षात प्रवेश केल्याने खासदार बाळूभाऊ धानोरकर व बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी सुजित खोब्रागडे यांचा स्वागत व सत्कार केला. याप्रसंगी कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक घनश्याम येनुरकर,संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष व संचालक राकेश रत्नावार,उपसभापती संदीप कारमवार, संचालक राजेंद्र कन्नमवार, किशोर घडसे, महिला कांग्रेस अध्यक्ष रुपाली संतोषवार, नगर सेविका ललिता फुलझेले, सुरेश फुलझेले, राजू पाटील मारकवार ,गुरु गुरनुले, दिनेश जिद्दीवार, अमित गोवर्धन, यांचेसह वार्डातील असंख कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
