प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - चंद्रपूर-गडचिरोली-नागपूर कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मुलची उमा नदी ओलांडून जावे लागते. परंतु मागील तीन वर्षांपासून गडचिरोली मुख्य हायवेचे highway सिमेंट कांक्रीटचे काम केले जात असून नदी जवळ तिहेरी रस्त्याचे काम सुरू आहे. मरेगाव मार्ग नागपूरकडे व आकापूर मार्ग गडचिरोली कडे आणि मुल मार्ग चंद्रपूरकडे वाहतुकीचे मुख्य रस्ते आहेत. परंतु मुलच्या उमा नदीवरील पुलाच्यावर मध्ये-मध्ये गॅप पडली आहे तसेच पुलावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असल्याने मोठ्या पुलावरुन काम होईपर्यँय वाहतुक बंद ठेऊन लहान पुलावरुन वाहतूक सुरु ठेवली आहे. परंतु खालच्या रस्त्यावर कंत्राटदारांनी चिकट माती टाकून ठेवल्याने रात्री आलेल्या पावसामुळे खालच्या रस्त्यावर ट्रक फसल्याने १७ आकटोम्बर २१ ला सकाळी ७ वाजेपासून जाणारी येणारी वाहतूक खोळंम्बली त्यामुळे नदीपासून ते आकापूर पर्यंत व मरेगाव पर्यंत मुल कडे येणाऱ्या रस्त्याची जुन्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या वळणापर्यंत ट्रक,ट्रॅकटर, कार,अशी तिन्ही रस्त्यावरील १७० वाहने चार-ते पाच तास वाहतूक ठप्प झाली होती त्यामुळे महत्वाच्या कामाने जाणाऱ्या येणाऱ्या वाहतूकदार यांना ताटकळत अडून राहण्याची पाळी आली. नदिपूलावरील पडलेली गॅप व खडे केव्हांच बुजवायला पाहिजे होते परंतु कंत्राटदाराने आणि संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने आज ही परिस्थिती उदभवली असल्याचे बोलले जात आहे. अतिशय महत्वाचे कामासाठी जात असलेल्या नागरिकांना अडून राहावे लागले याला जबाबदार कोण. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. Traffic Jam तसेच गडचिरोली हायवे रोडवर चिमढा नदीवरील पुलाचेही काम अजून अपूर्ण अवस्थेत असून नदीच्या एलीकडे व पलीकडे रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. व कंत्राटदार यांनी रस्त्यावर पिवळी चिकट माती टाकून ठेवल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. जातांना येतांना दुचाकी वाहन धारक चिखलामुळे घसरून पडल्याने नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. चिमढा नदीवरील जुन्या पुलावर पाच फुटाची मोठी खड्डे पडली असून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. अशी अवस्था असतांना संबंधित कंत्राटदार व हायवे कामावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. कंत्राटदार यांच्या चुकीमुळे एखादा मोठा अपघात झाला तर तो मी नव्हेच अशी भूमिका घेऊन कंत्राटदार व संबंधित विभाग यातून पळवाट शोधू शकतो अशी अवस्था प्रत्यक्षात दिसून येत आहे. ह्या यंत्रणेकडे देखरेख करण्याचे काम आहे त्यांनी त्वरित लक्ष घालावे आणि मान.जिल्हाधिकारी यांनी सुद्धा या महत्वाच्या समशेकडे तात्काळ पाहणी करुन संबंधित विभागाला व कंत्राटदाराला त्वरित काम करण्याच्या सूचना द्याव्या अशी मागणी शेकडो वाहतूक धारकांनी केली आहे.
