चंद्रपूर - : कोविड-19 या आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबास, वारसदारास 50 हजार रुपयाचे सानुग्रह अनुदान Sanugrah grant प्रदान करण्यात येणार असल्याचे शासनामार्फत कळविण्यात आले आहे. Covid 19 death
परंतु, याकरीता अमलांत येणाऱ्या ऑनलाईन online प्रक्रियेचा तपशील अद्याप अप्राप्त आहे. त्याबद्दलची माहिती शासनाकडून प्राप्त होताच तात्काळ सूचित करण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन Disaster Management प्राधिकरणाचे सचिव संपत खलाटे यांनी कळविले आहे.
