प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर :- नेहमीप्रमाणे आपल्या शेतात जात असताना एका सिमेंट भरलेल्या ट्रकने बैलगाडीस जोरदार धडक दिली. या यामध्ये बैलगाडी घेऊन जाणाऱ्या दोन शेतकऱ्यांसह एका बैलाचा जागीच मृत्यु झाला होता. सकाळच्या सुमारास बामणी - आष्टी मार्गावरील कळमना गावात घडली आहे. घटनेनंतर गावकऱ्यांनी काही काळ महामार्ग रोखून धरला.
सिमेंट भरलेल्या एका ट्रकने बैलगाडीस जोरदार धडक दिली. या यामध्ये बैलगाडी घेऊन जाणाऱ्या पुंडलिक काळे (५२) आणि अंबादास दुधकोहळे (४८) दोघेही रा. कळमना येथील आहे. या अपघातात एका बैलाचाही मृत्यू झाला आहे. सदर अपघातग्रस्त वाहन आष्टी मार्गाकडे जात होते. मात्र, चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. जोपर्यंत मृतकांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई मिळणार नाही तो पर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती.
मात्र पोलिसांनी गावकऱ्यांची समजूत काढली आणि मार्ग मोकळा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र रुग्णालयात पोहचल्यावर नागरिकांनी आर्थिक मदत मिळाल्याशिवाय मृतदेहाचे शवविच्छेदन करू देणार नाही अशी कठोर भूमिका घेतली.
दुपारी 12 वाजेपासून गावकऱ्यांनी रुग्णालयात तळ ठोकला होता. Farmer accident
बल्लारपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा परिषद सदस्य वैशाली बुद्धावार, सोमेश्वर पदमगिरीवार व राजू बुद्धलवार यांनी गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र गावकरी आर्थिक मदत देणार नाही तोपर्यंत शवविच्छेदन होणार नाही या भूमिकेवर ठाम होते.
सायंकाळी 7 वाजता माजी अर्थमंत्री व लोकलेखा समिती अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर रुग्णालयात पोहचले, व गावकऱ्यांशी चर्चा करीत स्वतः मृतकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1- 1 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली. Mla sudhir mungantiwar
पुढे कुटुंब साहाय्य योजना, शेतकरी अपघात बीमा योजना, संजय गांधी निराधार योजना व अंत्योदय योजनेतून पुन्हा मदत मिळवून देऊ असे आश्वासन गावकऱ्यांना दिल्यावर त्यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी होकार दिला.
दिवसभर चाललेलं गावकऱ्यांचे आंदोलन आमदार मुनगंटीवार यांच्या मध्यस्तीने संपुष्टात आले.
