गडचांदूर :- आदिवासी समाजाचे पूजनीय व श्रद्धास्थान असलेले राजा रावणच्या दहनावर बंदी असतानाही गेल्यावर्षी कोरपना तालुक्यात काही ठिकाणी रावणदहन करण्यात आले.हे कृत्य आदिवासी समाज बांधवांच्या भावना दूखवणारे असून पोलीस प्रशासनाने यंदातरी याकडे लक्ष देऊन ही प्रथा मोडकळीस आणावी अशी मागणी "क्रांतीवीर बिरसामूंडा Krantiveer Birsamunda आदिवासी बहुउद्देशिय मंडळ नांदा" च्या वतीने गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सत्यजित आमले यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
नांदा या गावात मागील २०१६ पासून रावणदहनाची Ravana dahan प्रथा बंद करण्यात आली होती.परंतू यंदा काही बिगर आदिवासी समाजाची मंडळी दसऱ्याच्या दिवशी रावणदहन करण्याच्या प्रयत्नात दिसत आहे.असे झाले तर आदिवासी समाजाकडून तिव्र स्वरुपाचा निषेध व्यक्त करण्यात येईल असा इशारा देत अशा पद्धतीने आमच्या न्यायप्रिय राजाचा अपमान करणार्यांवर अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करावी अशी मागणी किशोर मडावी,भारत आत्राम,नत्थू मडावी,अनील पेंदोर,प्रवीण कुरसंगे, सूनील पेदोर,गुरूदेव तिरानकर, देवानंद आत्राम, दिलीप उईके,सुभाष गेडाम,प्रशांत कुंमरे,नत्थू पेंदोर,नामदेव तोडासे सह इतरांनी निवेदनातून केली आहे.
