चंद्रपूर, दि.०२ : भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आणि बंदी कल्याण दिनानिमित्त Prisoner Welfare Day कारागृहातील बंदी बांधवासाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम व विविध शासकीय योजनांची माहिती देणा-या चित्रप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. चंद्रपूर जिल्हा कारागृह व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण District Legal Services Authority यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाचे उद्धाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश District and Sessions Judge कविता अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बिपीन अग्रवाल, जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.डी. केदार, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव किरण जाधव, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर शपी. सी. काळे, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. मोरे, श्री. हेमणे, कारागृह अधीक्षक वैभव आगे वरीष्ठ तुरुंगाधिकारी रविंद्र जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांचे प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करुन झाली. त्यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांचे हस्ते बंदीबांधवासाठी विविध शासकीय योजनांची माहिती देणा-या चित्रप्रदर्शनीचे Exhibition उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकेतून श्री. जाधव यांनी बंदीबांधवांना कार्यक्रमाचा व सदर अभियानाचा उद्देश सांगितला व बंदी सुधारणा या विषयावर मार्गदर्शन केले. कारागृहातील एका बंद्याने गांधीजी आणि त्यांचे अहिंसेचे विचार तसेच कारागृहातील सुधारणामय जीवन याबाबत आपल्या भावना मान्यवरांसमोर व्यक्त केल्या.
प्रमुख मार्गदर्शनामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमती वरखेडकर यांनी बंदी या शब्दाचे भारतीय स्वतंत्र्य संग्रामातील योगदान बंदीजनांना समजावून सांगितले व पुढील जीवनामध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी बंद्यानी चिंतन व मनन करावे, असे आवाहन केले. तर अध्यक्षीय भाषणातून कविता अग्रवाल यांनी बंदीजनांनी स्वत:मध्ये अपेक्षीत बदल घडविण्यासाठी सकारात्मक विचार करण्याचा, व्यसनापासून दुर राहण्याचा व महात्मा गांधींजीच्या अहिंसेच्या तत्वाला अंगीकारण्याचे आवाहन केले. Chandrapur District Jail
यावेळी वैभव आगे यांनी कारागृहातील सुधारणेसाठी बंद्याना उपलब्ध असलेल्या शैक्षणिक सुविधा, ग्रंथालयीन सुविधा, खेळ साहित्य व अन्य सुधारणात्मक उपक्रमे इत्यादीची तसेच यामुळे बंद्याच्या जीवनामध्ये होणा-या सकारात्मक बदलांबाबत माहिती दिली.
सदर कार्यक्रमाचे संचालन तुरुंग शिक्षक ललित मुंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुरुंगाधिकारी विठ्ठल पवार, सुनिल वानखडे सुभेदार देवाजी फलके, शिवराम चवळे, सिताराम सुरकार, कारागृह शिपाई रवी पवार, पंकज इंगळे व इतर कारागृह कर्मचारी आदींनी परीश्रम घेतले.