चंद्रपूर - कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले, देशात बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढत आहे मात्र सरकार बेरोजगारांच्या समस्येवर दुर्लक्ष करीत आहे.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी काही प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा पोलिस दल Chandrapur Police व SIS इंडिया लिमिटेड यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात तब्बल 300 सुरक्षा रक्षकांच्या जागा भरण्यात येणार आहे.
SIS इंडिया लिमिटेड ही कंपनी नावाजलेली असून महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्रप्रदेश येथे ATM, AIRPORT, MINES, हॉटेल, HOSPITAL, SHIP YARD, EDUCATION SOCIETY व Department of Archeology येथे आपल्या सेवा देत आहे.
सदर कंपनीतर्फे नियुक्त झालेल्या सुरक्षारक्षकांना प्रति महिना 12 हजार ते 18 हजार रुपये SALLERY, PF, GRATUITY बोनस व राहण्याची व्यवस्था करण्यात येते, विशेष म्हणजे सुरक्षारक्षकांच्या 2 मुलांना The Indian Public School, Dehradun येथे शिक्षणाच्या सुविधा पुरविल्या जातात. Sis Recruitment
सदर खाजगी सुरक्षा रक्षकांच्या पदासाठी शैक्षणिक अहर्ता दहावी उत्तीर्ण असावा वय 21 वर्ष ते 37 वर्षेपर्यंत असावा, वजन कमीतकमी 56 किलो असावे.
चंद्रपूर जिल्हा पोलिस व SIS इंडिया लिमिटेड कंपनीतर्फे आयोजित ह्या रोजगार मेळाव्यात उमेदवारांनी शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र व पासपोर्ट फोटो सोबत आणणे गरजेचे आहे, उमेदवारांतर्फे Registration साठी 350 रुपये शुल्क आकारण्यात येतील.
रोजगार मेळावा 15 ऑक्टोम्बरला पोलीस स्टेशन गडचांदूर, 16 ऑक्टोबर वरोरा पोलीस स्टेशन, 17 ऑक्टोबर चिमूर पोलीस स्टेशन, 18 ऑक्टोबर ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन, 19 ऑक्टोबर मूल पोलीस स्टेशन, 20 ऑक्टोबर राजुरा पोलीस स्टेशनच्या आवारात तर 21 व 22 ऑक्टोबर ला पोलीस मंगल कार्यालय तुकूम चंद्रपूरच्या आवारात घेण्यात येईल.
रोजगार मेळावा हा सर्व ठिकाणी सकाळी 10 वाजेपासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत असणार आहे. Job Fair In Chandrapur
आयोजित रोजगार मेळाव्याचा चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पोलीस प्रशासन व SIS इंडिया लिमिटेड कंपनी तर्फे करण्यात आले आहे.
It's good
उत्तर द्याहटवा