चंद्रपूर - जिल्हा स्टेडियम चंद्रपूर जवळ असलेले बाबा आमटे Baba Amte अभ्यासिकामध्ये आपल्या चंद्रपूर जिल्हातील सर्व भागातून विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या Maharashtra Public Service Commission परीक्षा असो, बँकेच्या परीक्षा असो किंवा अनेक स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरिता येतात. उपरोक्त परीक्षेचे अभ्यास करताना सकारात्मक वातावरण मिळणे अत्यंत गरजेचे असते. परंतु काही दिवसापासून असे लक्षात येते कि अभ्यासिकेची विज वारंवार खंडित होत आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त वेळ हा वाया जात आहे. त्यातल्यात्यात असे माहिती आहे कि अभ्यासिकेची स्वतःची सौर यंत्रणा Solar system असूनसुद्धा वीज मंडळाकडून मिळणाऱ्या वीज पुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे हि शोकांतिका आहे. यावर त्वरीत उपाययोजना करावी तसेच आपल्या जिल्ह्यातील अनेक विद्यार्थांनी स्पर्धा परीक्षेच्या पहिल्या प्रक्रिया या यशस्वीरीत्या पास केल्या आहेत आणि समोरच्या परीक्षा या पास करण्याकरिता आणखी कसून तयारी करण्याची गरज आहे. सोबतच अभ्यासिकेचा वेळ हा सकाळी ८ ते रात्री ८ फक्त एवढाच ठेवण्यात आलेला आहे. त्यातही कृपया वाढ करून हि वेळ दोन तासांनी वाढवून वेळ सकाळी ७ किंवा ८ ते रात्री १० वाजेपर्यंत करावी जेणेकरून आपल्या जिल्हातील हुशार, होतकरू विद्यार्थाना राज्य पातळी बरोबरच देशात विविध स्पर्धा परीक्षा Competitive examination उत्तीर्ण करण्यासाठी तयारी करण्यास मदत होईल. अश्या बाबतीचे मदतीचे निवेदन विद्यार्थ्यांनी युवासेना जिल्हाप्रमुख प्रमुख यांना देऊन मदत मागितली असता या विद्यार्थ्यांच्या मागणीला घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे,महानगर प्रमुख प्रमोद पाटील, तालुका प्रमुख संतोष नरूले यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना जिल्हाप्रमुख निलेश बेलखेडे यांच्या नेत्रुत्वात युवासेना च्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी यासंधर्भात प्रा. निलेश बेलखेडे यांनी व्यवस्थापक श्री. मोहरिल यांच्याशी फोनवर सविस्तर चर्चा केली असता उपरोक्त समस्यांचे अत्यंत गंभीरतेने घेऊन येत्या काही दिवसात निवारण करणार असे सकारात्मक प्रतिपादन दिले . यावेळी निवेदन देतांना शिष्टमंडळात जिल्हा चिटनीस विनय धोबे, शहर प्रमुख अक्षय अंबिरवार, समन्वयक करन वैरागडे, शहर चिटनीस नगाजी गनफाडे, नंदकिशोर अराडे,प्रा. भोयर, अमोलभाऊ, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
