चंद्रपूर - चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या सरिता पालिवाल ह्या काही कामानिमित्त घराला ताला लावून बाहेर गेल्या होत्या मात्र त्यावेळी कुणीतरी घरात प्रवेश करीत सोने-चांदीचे दागिने gold silver jewellery चोरी करून नेले.
घरी आल्यावर पालिवाल यांना सदर बाब कळताच त्यांनी तात्काळ चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. City police
शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तात्काळ तपासाला सुरुवात केली, पेट्रोलिंग करीत असताना रेकॉर्डवरील कुख्यात घरफोडी करणारे पोलिसांच्या हाती लागले.
आरोपी 27 वर्षीय अंकुश उर्फ डेव्हिड गजानन वानखेडे व 25 वर्षीय वैभव उर्फ आऊ परमेश्वर झाडे दोन्ही रा.बाबा नगर बाबूपेठ यांना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी किरमे लेआउट येथे घरफोडी केली असल्याची कबुली दिली.
पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तपास 72 तासांच्या आत केला असून आरोपी जवळून 1 तोळ्याचा सोन्याचा गोप, 2 ग्रामचे सोन्याचे पेंडल, सोन्याची अंगुठी, कानाचे टॉप्स, पुरातन काळातील 15 चांदीचे शिक्के, रोख 10 हजार असा एकूण 1 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
72 तासांच्या आत शहर पोलिसांनी ही प्रशंसनीय कामगिरी बजावली, सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे, सपोनि घोडमारे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शोध पथकाचे पोउपनी निलेश वाघमारे, विजय कोरडे, शरीफ शेख, दौलत चालखुरे, विलास निकोडे, महेंद्र बेसरकर यांनी यशस्वीपणे पार पाडली.
