गडचांदूर :- गडचांदूर येथील शरदराव पवार sharad pawar कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह यांना गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचा उत्कृष्ट प्राचार्य म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे.गोंडवाना विद्यापीठात २ ऑक्टोंबर २०२१ रोजी संपन्न झालेल्या १० व्या वर्धापन दिन व दशमानोत्सव सोहळ्यात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण Technical education मंत्री ना.उदय सामंत यांच्या हस्ते डॉ.सिंह यांना सपत्नीक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
याप्रसंगी आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे,गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.श्रीनिवास वरखेडी, प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे व कुलसचिव डॉ.अनील चिताडे तथा गोंडवाना विद्यापीठाचे Gondwana University माजी कुलगुरू डॉ. विजय आईंचवार आणि डॉ.किर्तीवर्धन दीक्षित,डॉ.नामदेव कल्याणकर,प्रभुती यांची प्रमुखाने उपस्थिती होती. सन्मान चिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.डॉ.संजय कुमार सिंह यांची प्राचार्य म्हणून ११ वर्षे प्रशासकीय सेवा झाली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे.सदर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल डॉ.सिंग यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.
