चंद्रपूर - शहरातील भिवापूर प्रभागात रावण एरिया मध्ये मागील 1 वर्षांपासून खुल्या जागेत पालिकेने शहरातील कचरा टाकणे सुरू केले होते.
परिसरातील नागरिकांचे त्या कचरा व घाणीमुळे आरोग्य धोक्यात आले होते, अष्टभुजा परिसरात मनपाचे डम्पिंग यार्ड असून सुद्धा भिवापूर भागात सदर कचरा टाकणे ही नित्याची बाब झाली. Chandrapur municipal corporation
अखेर शिवसेना उपशहर प्रमुख प्रकाश चंदनखेडे यांनी शिवसेना स्टाईलने राडा करीत सदर डम्पिंग यार्ड बंद पाडला. Shivsena protest
कचरायुक्त जागेची स्वच्छता करण्यासाठी स्वखर्चाने JCB ला पाचारण करून सदर परिसर साफ करण्यात आला.
एकीकडे पालिका आम्ही स्वच्छतेमध्ये नंबर 1 असे गुणगान करते मात्र दुसरीकडे शहराची घाण एका प्रभागात जमा करून कचरागिरी करून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणण्याचे काम करते.
उपशहर प्रमुख चंदनखेडे यांनी पालिकेला हे डम्पिंग यार्ड तात्काळ बंद करावे अन्यथा पालिकेच्या एकाही गाडीला सदर भागात येऊ देणार नाही अशी भूमिका घेतली होती. Dumping yard chandrapur
मात्र पालिकेला शिवसेनेच्या इशाऱ्यावर नमते घेत डम्पिंग यार्ड बंद करावे लागले.
सदर आंदोलन हे शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.
यावेळी बंडू जांगडे, विनोद केळझरकर, मुबारक शेख, बंटी हजारे व प्रशांत भोसले यांची उपस्थिती होती.
