चंद्रपूर - शहरातील सुभाष कॉलनी, बंगाली कॅम्प परिसरातील दुचाकी वाहन चोरी झाल्याची तक्रार 15 ऑक्टोम्बरला रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती.
Dio मोपेड दुचाकी वाहन क्रमांक एम.एच. 34 ए वाय 2901 किंमत अंदाजे 25 हजार हे वाहन फिर्यादीने आपल्या मित्राच्या घरासमोर होती, काही वेळाने फिर्यादी गाडीजवळ आला असता त्याठिकाणी वाहन आढळून आले नाही. Rohit shetty arrested
फिर्यादीने आजूबाजूच्या परिसरात शोधाशोध केली मात्र वाहन कुठेही आढळले नसल्याने यासंदर्भात रामनगर पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविण्यात आली.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सपोनि हर्षल एकरे पोउपनी विनोद भुरले व तपासी अधिकारी पुरुषोत्तम चिकाटे व
कर्मचाऱ्यांनी तपासाला सुरुवात केली, गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी बंगाली कॅम्प येथे राहणारा 28 वर्षीय रोहित राजू शेट्टी याला ताब्यात घेत विचारपूस केली असता सदर दुचाकी त्याने चोरी केली असल्याची कबुली दिली.
यापूर्वी रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी गेलेल्या तब्बल सदर दुचाकी सह एमएच ३४ एवाय २९०१, एमएच ३४ झे ५४९७, एमएच ३४ एएस ५६५५, एमएच ३४ एएल ७३३२ आरोपीच्या घरून जप्त करण्यात आल्या.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधिक्षक अतुलचंद्र कुलकर्णी, उपविभागिय पोलीस अधिकारी नंदनवार यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याचे पोनि मधुकर गिते, सपोनि हर्षल अकरे, पोउपनि विनोद भुरले, पो हवा. रजनीकांत पुठ्ठावार, प्रशांत शेंदरे, नापोशि / पुरूषोत्तम चिकाटे, विनोद यादव, पेतरस सिडाम, संजय चौधरी, किशारे वैरागडे, पांडुरंग वाघमोडे, निलेश मुडे, सतिश अवथरे, पोशी लालु यादव, विकास जुमनाके, संदिप कामडी, माजीद पठान, हिरालाल गुप्ता, मनापोशि भावना रामटेके यांनी केली आहे.
