प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - माँ.दुर्गा मंदिर समितीच्या वतीने मंदिराच्या नियोजित जागेवर आद्यशक्ती महिषासुर मर्दिनी, अष्ठभुजा धारिणी श्री.माँ.दुर्गा देवीची जागृत पावन मूर्ती असलेल्या नियोजित स्थळी नवरात्र महोत्सव शासनाच्या निर्देशाचे पालन करुन साजरा करण्यात आला. महोत्सवात सकाळ-संध्याकाळी आरतीला भक्तजनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिनांक १३ October बुधवारला मागील दोन वर्षांच्या काळात कोरोना महामारीत आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली. अशा तालुक्यातील अनेक विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेवक,डाँक्टर, नर्स,विस्तार अधिकारी, रुग्ण वाहिका ड्रायव्हर, अशा ४१ कोरोना योद्धांचा corona worrier शाल, श्रीफळ,गौरव चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सायंकाळी ७-०० वाजता समाजिक सभागृहाचे भूमिपूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकप्रिय खासदार बाळूभाऊ धानोरकर ,मंदिर समितीचे अध्यक्ष तथा CDCC बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे हस्ते करण्यात आले. व खासदार बाळूभाऊ यांनी मंदिराला २५ लाख रुपयाचा वाढीव निधी मंजूर केला. भूमीपूजनाला राज्याचे बहुजन कल्याण,मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री आणि जिल्ह्याचे पालक मंत्री उपस्थित राहणार होते परंतु त्यांना तांत्रिक अडचणीमुळे उशीर होणार असल्याने नाम.विजय वडेट्टीवार यांनी मोबाईलवर व्हिडीओ कांफर्सद्वारे प्रत्यक्ष बोलून उपस्थित मातेच्या भक्तांना शुभेच्छा देतांना मी सुद्धा दुर्गा मातेचा भक्त आहे. आणि मातेच्या भक्तांना मी काहीच कमी पडू देणार नाही. आपण माझी आतुरतेने वाट बघत आहात यासाठी मी आपला आभार व्यक्त करुन मंदिरासाठी परत ५० लाख रुपये मंजूर करीत असल्याचे जाहीर केले. बैल,म्हशी,यांना वाघाने मारलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत
तालुक्यातील नरेंद्र चौधरी टेकडी,देविदास मोहूर्ले टेकडी, वासुदेव ढोले फ़ुलझरी,रविशंकर भोयर जाणाला, यांच्या बैल,म्हशीला वाघाने ठार केल्याने CDCC बँकेच्या शेतकरी कल्याण निधीमधून प्रत्येकाला १० हजार रुपयांची आर्थिक मदतिचे वाटप अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचेहस्ते करण्यात आले.याप्रसंगी तालुका कांग्रेसचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनश्याम येनुरकर,संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष राकेश रत्नावार, उपसभापती संदीप कारमवार,संचालक राजेंद्र कन्नमवार, राजू पाटील मारकवार,नगर सेविका ललिता फुलझेले, मंदिर समितीचे पदाधिकारी, महिला समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी केले. संचालन समितीचे सचिव संजय पडोळे यांनी केले.
विश्वस्त गुरु गुरनुले यांनी आलेल्या मान्यवरांचे,देणगीदारांचे, सहकार्य करणाऱ्यांचे, उपस्थित सर्व मातेच्या भक्त जणांचे जाहीर आभार मानले. नवरात्र महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी संजय पडोळे, राकेश रत्नावार, घनश्याम येनुरकर,संदीप कारमवार,अखिल गांगरेड्डीवार, राजेंद्र कन्नमवार, केदारनाथ कोटगले,रुपल रावत, चतुर मोहूर्ले, सुनील मंगर,देशमुख साहेब,गुरु गुरनुले, विवेक मुत्यालवार, संदीप मोहबे, अरुण मंदेवार, चंदू चतारे, संतोष वाढई, लोमेश नागपुरे, अशोक येरमे, पंडित मिश्रा, महिला पदाधिकारी अध्यक्ष ममता रावत,संध्या कोटगले,जया मोहूर्ले, मोना रावत, वर्षा पडोळे, सौ.मुरकुटे, सौ. येनुरकर,सौ.,रत्नावार, सौ. गांगरेड्डीवार, सौ.कन्नमवार, सौ.चिमदयालवार, सौ.चतारे इत्यादी महिला सदस्यांनी व पुरुष सदस्यांनी सहकार्य केले.
