चंद्रपूर :- स्व. धुन्नु महाराज (पं. गयाचरण त्रिवेदी) पूर्व नगराध्यक्ष यांचे दुःखद निधन फार वेदना देणारे असे आहे. Dhunnu maharaj त्यांचे नगराध्यक्ष कार्यकाळात मी नगरसेवक असतांना त्यांचेसोबत कार्य केले. त्यांचे विकासकार्य, कार्यपध्दती फार जवळुन पाहिली. स्वच्छ प्रशासनासोबत निष्कलंक त्यांचा कार्यकाळ जवळपास 15 वर्ष चंद्रपूर नगरितील जनतेनी अनुभवला. तुटपुंज्या फंडातून विकास कार्य करतांनाची कसरत ते करीत होते.
एक सामाजिक व आध्यात्मावर प्रचंड आस्था असणारे मनमिळावू, स्पष्टवक्ता, आम्हाला मार्गदर्शन करणारे नेतृत्व आम्ही गमावलं. फार दुःखद आहे. त्यांना मी श्रध्दांजली अर्पण करतो.
