प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - माँ.दुर्गा मंदिर समितीच्या वतीने मंदिराच्या नियोजित जागेवर आद्यशक्ती महिषासुर मर्दिनी, अष्ठभुजा धारिणी भव्यदिव्य आकर्षक श्री.माँ.दुर्गा देवीच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापणा हजारो भक्तजनांच्या उपस्थितीत महाकलाश भव्य शोभायात्रा काढून २६ फेब्रुवारी २०१६ रोजी भक्तिमय वातावरणात मंदिर समितीचे अध्यक्ष विद्यमान CDCC बँकेचे अध्यक्ष तथा माजी जि.प. अध्यक्ष संतोषसिंह रावत व सौ.ममता रावत यांच्या हस्ते २१ पंडितांनी केलेल्या महापूजेने, शांती हवणाने करण्यात आली होती. आज माता दुर्गा देवीची श्रद्धा संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील भाविकांसाठी आशेचे श्रध्दास्थान व जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध झाले आहे. अशी भव्य दिव्य मूर्ती चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात एकमेव असल्याने आद्यशक्तीच्या दर्शनासाठी दरवर्षीच नवरात्र महोत्सवात महिला,पुरुष,बाल-गोपाल यांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. मागील दोन वर्षांपासून कोविड-१९ महामारीच्या काळात देवीच्या भक्तांना माँ. दुर्गा देवीचे दर्शन घेता आले नाही. परंतु शासनाने यावर्षी शासकीय नियमाच्या आधीन राहून,दिलेल्या निर्देशाचे पालन करण्याच्या अटीवर मंदिराचे दार उघडल्याने मातेच्या भक्तांना दिलासा मिळाला व नियमांच्या आधीन राहून,मॅक्सचा वापर करून देवीचे दर्शन घेता येत असल्याने भक्तजनांच्या शासनाप्रति आभार व्यक्त करीत आहेत. यावर्षी साध्या स्वरुपात माँ.दुर्गा मंदिर स्थळी घटस्थापना करण्यात आली असून आज दिनांक १३ आकटोम्बर २०२१ रोजी अष्टमी निमित्य भक्तजनांसाठी महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. सोबतच मुल नगरातील व परिसरातील सर्वसामान्य गोर-गरीब जनतेच्या लग्न कार्यासाठी,छोट्या- मोठ्या घरगुती समारंभासाठी, तसेच सामाजिक कार्यासाठी अतिशय वाजवी व अल्पदरात सामाजिक सभागृह उपलब्ध व्हावे म्हणून जिल्हा खनिजविकास निधी व लोकप्रिय खासदार श्री.बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्थानिक विकास निधीमधून सामाजिक सभागृह बांधण्याचा संकल्प मंदिर समितीने केला आहे. याचा भूमिपूजन सोहळा व कोरोना योद्धांचा गौरव समारंभ आज बुधवार १३ रोजी सायंकाळी ५-००वाजता करण्याचे योजिले आहे. जिल्ह्याचे पालक मंत्री व राज्याचे बहुजन कल्याण भूकंप मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री नाम. विजय वडेट्टीवार यांच्या शुभहस्ते होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार बाळूभाऊ धानोरकर, तर मुख्य अतिथी माजी मंत्री,जिल्ह्याच्या जेष्ठ महिला नेत्या श्रीमती शोभाताई फडणवीस व मंदिर समितीचे अध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे.तरी आज होत असलेल्या महाआरतीला व भूमिपूजन सोहळ्याला मातेच्या भक्त जणांनी,मुल नगरातील व तालुक्यातील भाविकांनी, बहुसंख्येनी उपस्थित राहावे अशी विनंती मंदिर समितीचे अध्यक्ष संतोषसिंह रावत,सचिव संजय पडोळे,व मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी,संचालक मंडळ,महिला पदाधिकारी, युवक सदस्य यांनी केली आहे.

