चंद्रपूर - दिवाळीचे औचित्य साधून विठाई बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने रांगोळी स्पर्धेचे आयोजन स्थानिक जगन्नाथ बाबा मठ येथील सभागृहात करण्यात आले आहे.
संस्थेच्या वतीने सामाजिक तसेच वेगवेगळे उपक्रम घेण्यात येतात. याच अनुषंगाने दिवाळीचं औचित्य साधून दिनांक 31 ऑक्टोबर रविवार दुपारी 12 वाजता ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी 18 ते वरील वयोगटातील महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 3 प्रकारात घेण्यात येणार आहे. त्यात १) संस्कार भारती २) टिपक्याची रांगोळी३)पोस्टर रांगोळी विषय -(घे..भरारी) असून जास्तीत जास्त स्पर्धकानी यात सहभाग घ्यावा. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धकांनी आपले नाव नोंदणी जाहिरातीत दिललेल्या Whatsup मोबाईल क्रमांक 9588698199 शुक्रवार पर्यंत पाठवायचे आहे.
प्रथम नोंदणी झालेल्या 50 स्पर्धकांना स्पर्धेत भाग घेता येईल.
