प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल- शेतकरी आणि सामान्य जनतेच्या हक्काची बँक म्हणुन ओडखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने ऐन शेतीच्या हंगामात मुल तालुक्यातील नवेगाव (भु) येथील शेतकरी रामदास जनुजी पाल या शेतकऱ्यांचा बैल आकस्मिक रित्या मेल्याने शेतकरी शेती कसण्यापासून वंचीत झाला होता ही बाब नवेगाव भुजला येथील माजी सरपंच सुमित पाटील आरेकर यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी. प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे लक्षात आणून दिली असता बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी अती तात्काळ शेतकरी कल्याण निधी मधून आर्थिक साहाय्य रुपये १०,०००/-(दहा हजार) मदत मंजूर करून मदतीचा चेक माजी सरपंच सुमित पा. आरेकर यांना दिला. देण्यात आलेला आर्थिक मदतीचा चेक शेतकरी श्री.रामदास जनुजी पाल यांना नवेगाव येथे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन माजी सरपंच सुमित आरेकर, ग्राम पंचायत सदस्य संतोष चावरे, ग्राम पंचायत सदस्य सौ.प्रेमीला भिवनकर, दीगांबर भाकरे, प्रफुल मोहरकर, अजय खोब्रागडे, गणपतची आरेकर, बंदुजी चुदरी, रमेश पाल,खुशाल पाल, पूनाजी पाल, गोसावी चावरे, हामाजी पाल आदी नवेगाव ग्रामस्थ उपस्थित होते.
निराधार झालेल्या शेतकरी यांना बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी तात्काळ आर्थिक मदतीचा आधार दिल्याबद्दल माजी सरपंच सुमित आरेकर, सदस्य संतोष चावरे व गावकऱ्यांनी अध्यक्ष संतोषसिंह रावत आणि संचालक मंडळासह बँकेचे आभार मानले आहे.
