गडचांदूर :- कोरपना तालुक्यातील वनसडी, पिपर्डा, कारगाव रस्ता जिवती तालुक्याला जोडणारा असून २०१९ मध्ये मुख्यमंत्री सडक योजनेत मंजूर झाला आहे.असे असताना तब्बल दोन वर्षांचा कालावधी लोटूनही परिस्थिती जैसे थेच बनून आहे. तांत्रीक व प्रशासकीय मंजूरी तसेच निविदा प्रकिया पार पडली मात्र संबंधीत कंत्राटदाराने contracter या रस्त्याच्या कामाला सुरूवात केलेली नाही.यामुळे नागरिकांना मोठ्याप्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे.मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आदिवासी भागात थंडबसत्यात असल्याचे आरोप होत असून सदर रस्त्याच्या कामाला त्वरित सुरूवात करावी अशी मागणी राकाँ जिल्हा उपाध्यक्ष सैय्यद आबीद अली यांनी संबंधीत विभागाकडे केली आहे.
सदर रस्त्यावर खड्ड्यांचा साम्राज्य पसरल्याने दुचाकी चालवणे अक्षरशः जिकरीचे ठरत असून कित्येक दुचाकीस्वारांचे अपघात सुध्दा घडले आहे. चारचाकी वाहन चालकांना हा रस्ता मोठ्याप्रमाणात डोकेदुखी ठरत आहे.काम सुरू करण्यास संबंधीत कंत्राटदार चालढकल करत असल्याचे आरोप होत असून खड्डेयुक्त सदर रस्ता खड्डेमुक्त केव्हा होणार हे मात्र कोडेच बनले आहे. मोठ्याप्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने कमीतकमी रस्त्यावरील खड्डे तरी बुजवून दिलासा द्या अशी मागणी वजा विनंती त्रस्त नागरिक करीत असून हंगाम सुरू झाला, चारचाकी वाहन किंवा बैलबंडीने शेतातील पिके घरापर्यंत आणावी लागते,मात्र रस्त्याची दयनीय अवस्था पाहून केंव्हाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.यासर्व बाबींवर लक्ष देऊन रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे जेणेकरून होणार्या त्रासापासून नागरिकांची सुटका होईल अशी मागणी आहे. आता कामाला सुरूवात केव्हा होईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
