प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - महाराष्ट्र राज्याचे बहुजन कल्याण आणि मदत पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.विजय वडेट्टीवार यांनी मागील दोन वर्षांपासून कोविड-१९ मूळे तालुक्यातील ग्राम पंचायतची आर्थिक स्थिती डबघाईस आलेली आहे त्यामुळे तालुक्यातील सरपंच संघटनेने लेखी निवेदन देऊन नाम.पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना ग्राम पंचायतीचे थकीत वीज बिल डी.पी.सी.मधून भरण्यात यावे अशी विनंती केली होती. त्यावेळी नाम.वडेट्टीवार यांनी सहा महिन्यांची विजेचे बिल डी.पी.सी.मधून भरण्यात यावे असे आश्वासन तालुक्यातील सर्व सरपंच यांना दिले होते. तरी देखील ग्राम पंचायतीचे विजेचे बिल भरण्यात आलेले नाही. म्हणून चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी मूल तालुक्यात कामाच्या पाहणी संदर्भात दौऱ्यावर आले असता मुल पांच्यायत समितीच्या भेटी दरम्यान त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन भेजगाव ग्राम पंचायतीचे सरपंच व तालुका सरपंच समितीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अखिल गांगरेड्डीवार यांनी सर्व तालुक्यातील सरपंच यांच्या वतीने लेखी निवेदन देऊन विजेचे बिल भरण्यात यावे अशी मागणी केली.
तसेच ग्राम पंचायत मध्ये संगणक परीचालकाचे काम करणारे यांची मनमानी खूप वाढली असून पदाधिकाऱ्यां सोबत आणि काम करण्यासाठी आलेल्या नागरिकांसी सुद्धा तसेच सचिव यांचेशी अरेरावीने वागतात त्यामुळे काम करण्यासाठी आलेल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यांना वेतन १५ व्या वित्त अयोगाच्या निधीमधून करण्यात येत असल्याने कामचुकार करून मानसिक त्रास देत आहेत करिता प्रशासनाने त्यांना ताकीद द्यावी अशी मागणी सुद्धा तालुका उपसरपंच संघटनेच्या वतीने सी.ई.ओ. मॅडम मिताली शेठी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देतांना सरपंच समितीचे अध्यक्ष अखिल गांगरेड्डीवार,उपाध्यक्ष रवींद्र कामडी,सचिव हिमानी वाकुडकर, कोषाध्यक्ष सरपंच लोणारे, सहसचिव काजू खोब्रागडे, सदश हरिभाऊ एनगटीवार, करुणा उराडे, गोविंदराव वनकर,योगिता गेडाम, वासुदेव वाघ,जालिंदर बांगरे, यांचेसह तालुक्यातील सर्व उपसरपंच उपस्थित होते. निवेदनाच्या प्रति पालक मंत्री विजय वडेट्टीवार, जी.प.अध्यक्षा सौ.संध्याताई गुरनुले, संवर्ग विकास अधिकारी डाँ.मयूर कळसे यांनाही उचित कार्यवाहीसाठी देण्यात आले आहे.
