चंद्रपूर - 27 सप्टेंबरला वरोरा येथील 2 अल्पवयीन मुली मैत्रिणीचा वाढदिवस असल्याचे सांगत घरून निघाल्या होत्या मात्र सायंकाळ पर्यंत दोन्ही मुली घरी न आल्याने मुलींच्या कुटुंबीयांनी नातेवाईक व शेजाऱ्यांकडे विचारपूस केली मात्र दोघींचाही थांगपत्ता न लागल्याने कुटुंबीयांनी अज्ञात व्यक्तींनी फूस लावून पळविल्याची तक्रार 28 सप्टेंबरला वरोरा पोलीस स्टेशनला दिली. Kidnapping
पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला प्रकरण गंभीर असल्याने सदर प्रकरण जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे वळते केले. Chandrapur Lcb
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी चार पथक नेमले, पथकांनी सदर घटनेच्या सर्व सखोल बाबी तपासून माहिती गोळा केली.
माहिती गोळा केल्यावर पथकाला नवी बाब माहिती पडली सदर अल्पवयीन मुली Minor girls यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील काही मुलांच्या संपर्कात होत्या.
माहितीनुसार पथके राळेगावच्या दिशेने रवाना केल्या, त्याठिकाणी गेल्यावर पुन्हा 1 मुलगी बाभूळगाव निवासी त्याच दिवशी म्हणजे 27 सप्टेंबरला अपहरण केल्याबाबत तक्रार दाखल असल्याची माहिती मिळाली.
सदर अपहरण एकाच टोळीने केले असावे असे निष्पन्न झाले, 29 सप्टेंबरला सदर मुली वर्धा रेल्वे जंक्शन येथे दिसून आल्याची माहिती मिळाली.
सदर मुली व त्यांना पळविणारी टोळी पुणे Pune जिल्ह्यातील रांजणगाव येथे असल्याची माहिती प्राप्त झाली.
सदर प्रकरणाची माहिती चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी पुणे पोलिसांना कळवली व सापळा रचत तीन अपहत मुली व 4 संशयित आरोपींना अटक करण्यात आली.
आरोपी रोहीत गोपाल संगीले वय २० वर्षे, शुभम संजय मानेकर वय २२ वर्षे, प्रमोद मोतीबाबा सोनवने वय २२ वर्षे, प्रक्षिक विलास भोयर वय २३ वर्षे सर्व रा.राळेगांव जि. यवतमाळ हे मिळून आल्याने सर्वांना ताब्यात घेवून चंद्रपूर येथे आणण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरू आहे. सदरची यशस्वी कामगीरी अरविंद साळवे पोलीस अधीक्षक चंद्रपुर, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात पो.नि. बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा, स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे स.पो.नि.जितेंद्र बोबडे, पो.उपनि. संदीप कापडे, संचिन गदादे, अतूल कावळे, पो.स्टॉफ पो.हवा.धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, ना.पो. शि.गजानन नागरे, पो.शि.प्रशांत नागोसे, संदीप मुळे, चा.ना.पो.शि.दिनेश अराडे यांनी केली.
