प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष कांग्रेसचे नेते तथा माजी जि. प.अध्यक्ष संतोषशिंह रावत यांनी अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्या बरोबर बँकेच्या विकासाच्या दृष्टीने धोरणात्मक बदल करून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय हाती घेतले तेंव्हापासूनच संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील कँसरसारख्या दुर्धर आजारांनी त्रस्त असलेल्या गंभीर रूग्णांना, शेतकरी कल्याण निधी मधून उपचारासाठी आर्थिक मदत देण्याचे काम करीत आहे. आतापर्यंत अनेक कॅन्सरग्रस्त व दुर्धर आजार असलेल्या रुग्णांना बँकेचा आधार देण्याचे काम बँक करीत असून बँकेच्या मदतीने अनेक रुग्ण बरे झाले आहेत. मुल तालुक्यातील मारोडा येथील कॅन्सरग्रस्त शेतकरी रुग्ण बबन बुरबांदे यांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन कुटुंबियांना बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी आर्थिक मदतीचा चेक दिला. Cdcc bank chandrapur
याप्रसंगी तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनशाम येनुरकर, संचालक राजेंद्र कन्नमवार, अशोकराव पूलावार, पंकज पूल्लावार, सुरेश कालबोगवार,मंगेश बततुलवार, वामन पिंपळे, सुधाकर शेंडे, जितेंद्र गुरनुले, गणेश वैरांगडे, किशोर गभने,मयूर आकुलवार, राहुल शंखदरवार, आशिष शंखदरवार, अतुल कागदेलवार, नंदू बतकमवार, चेतन पेडपल्लीवार यांचेसह मारोडा येथील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या सहकार्याबद्दल उपस्थित गावकऱ्यांनी भाऊंचे आभार मानले.
