चंद्रपूर - चंद्रपूर मनपातील तुकूम प्रभाग क्रमांक 1 मध्ये 2018-19 या वर्षातील खासदार हंसराज अहिर यांच्या निधीतून मंजूर करण्यात आलेले शिवनेरी मैदानावर स्वातंत्रवीर विनायक सावरकर व्यायामशाळेचे आज लोकार्पण करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते करण्यात आले. Hansraj ahir
मात्र या लोकार्पण कार्यक्रमात इंटक युवक कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती यांनी कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी गोंधळ घातला. Vinayak sawarkar
काही वेळात हा गोंधळ शांत झाला पण 26 लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सावरकर व्यायामशाळेच्या नावाला कांग्रेस ने विरोध केला असला तरी तो विरोध नेमका काय? यामध्ये गोंधळ उडाला प्रशांत भारती यांनी शिवनेरी मैदानाचे controversy नामकरण कशाला हा प्रश्न विचारला, मात्र शिवनेरी मैदानात व्यायामशाळा सावरकर यांच्या नावाने जरी असली तरी मैदानाचे नाव शिवनेरी असणार आहे.
सदर गोंधळाने लोकार्पण कार्यक्रमात नवा गोंधळ उडाला, लोकार्पण कसले व विरोध कुणाला हे कदाचित इंटक युवक कांग्रेस जिल्हाध्यक्षाला कळले नसणार.
बातमीत दिलेल्या व्हिडीओ मध्ये आपल्याला समजेल नेमका गोंधळ काय आणि विरोध काय?
