गडचांदूर :- कोरपना तालुक्यातील औद्योगिक नगरी नांदा येथील पत्रकार तथा समाजसेवक गणश लोंढे यांच्या वाढदिवस २३ आक्टोंबर रोजी नांदा शहर युवक मित्रमंडळातर्फे स्थानिक विधवा,निराधार व गरजू महिलांना ब्लँकेटचे वाटप तसेच आगामी दिवाळीचा सण आनंदाने साजरा व्हावा या उदात्त हेतूने फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून या महिलांना दिवाळीची गोड भेट वस्तू देण्यात आली.या स्तुत्य उपक्रमाचे गावकर्यांनी तोंडभरून कौतुक केले असून येथील ध्येयवेडे तरूण नेहमीच अशाप्रकारे सामाजिक व जनहिताच्या कार्यात अग्रेसर असतात हे मात्र विशेष. Journalist birthday
नांदा शहर युवक मित्रमंडळातर्फे स्थानिक सांस्कृतिक भवन येथे एका छोटेखानी कार्यक्रमात हा उपक्रम राबविण्यात आला.अंदाजे ५५ गरजू महिलांना ब्लँकेट व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमात गावातील प्रतिष्ठित नागरिक व गावकऱ्यांनी मोठ्यासंख्यने उपस्थिती दर्शवून पत्रकार लोंढे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच उपस्थित मान्यवरांनी यांच्या कार्याबद्दल स्तुतिसुमने उधळली. कार्यक्रमात सं.गा.नि.योजना माजी तालुकाध्यक्ष संजय मुसळे,माजी उपसरपंच बंडू वारकर,मारोती बुडे,मुरली बोडखे, शैलेश लोखंडे,अरविंद इंगोले,नरेंद्र अल्ली, बंडू गायकवाड,हेमंत काळे,अंसार शेख, मोहसीन खान, सचीन बोढाले,हारुण सिद्दीकी यांच्यासह इतरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन प्रा. आशीष देरकर,आभार अभय मुनोत यांनी व्यक्त केले. नांदा येथे एका पत्रकाराचा अशाप्रकारे वाढदिवस साजरा करण्याची बहोत्तेक ही पहिलीच वेळ असावी असे मत ठिकठिकाणी व्यक्त होत असून News34 परिवारातर्फे पत्रकार गणेश लोंढे यांना वाढदिवसाच्या तसेच भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
