चंद्रपूर - चंद्रपूर मनपाच्याया कार्यकाळाला साडेचार वर्षे झाली आहे मात्र शहराचा विकास अजूनही ढेपाळलेल्या अवस्थेत आहे, रस्त्यावर आज या साडेचार वर्षाच्याया कालावधीत फक्त खड्ड्यांचा विकास झाला आहे.
नियोजन शून्य पालिका म्हणून आज चंद्रपूर मनपाची ओळख झाली आहे, नगरसेवक फक्त स्वतःचा विकास कसा होणार याकडे जास्त लक्ष देत आहे.
असाच एक प्रकार 9 ऑक्टोम्बरला सकाळी उघडकीस आला. Chandrapur municipal corporation
शहरातील रामनगर येथील मेडिकल कॉलेज समोर medical college मागील काही दिवसांपासून रेती पडलेल्या अवस्थेत होती, मात्र आज महानगरपालिका कर्मचारी छोट्या हातगाडीने रेती पालिकेचे सभापती भाजपचे रवी आसवानी यांच्या निर्माणाधिन घरासमोर टाकत होते.
पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा नगरसेवक खाजगी कामासाठी वापर करीत आहे.
कर्मचाऱ्यांना याबाबत विचारले असता त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की मेम्बर साहेबाने सांगितले की ही रेती घरासमोर टाकायची आहे म्हणून आम्ही त्याठिकाणी आणून टाकली. Use for private work
मात्र या कामासाठी पालिकेचे मनुष्यबळ व पालिकेच्या गाड्यांचा वापर करण्यात आला, शहराचा विकास टाळून आपल्या विकास कसा लवकर पूर्णत्वास होणार याकडे पालिका सभापती यांचं लक्ष आहे असे या प्रकारावरून दिसून येते.
विशेष म्हणजे चंद्रपूर मनपा ही भाजपच्या ताब्यात असून सध्या स्थायी समिती सभापती हे रवी आसवानी आहे, मात्र आपल्या पदाचा कसा वापर करावा हे कदाचित ते विसरले असणार. जटपुरा प्रभागात चारही नगरसेवक हे भाजपचे निवडून आले होते, त्यामध्ये रवी आसवानी यांची स्थायी समिती सभापती पदी नियुक्ती झाली.
यासंदर्भात पालिका आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला मात्र संपर्क होऊ शकला नाही.
पालिकेचे कर्मचारी खाजगी कामासाठी नगरसेवकाच्याया दारी असे म्हणायला हरकत नाही.