चंद्रपूर - राष्ट्रवादी कांग्रेसच्या पदाधिकारी संवाद कार्यक्रमात दाखल झालेल्या राष्ट्रवादी कांग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपचे किरीट सोमय्या यांचेवर चांगलीच टोलेबाजी केली.
कांग्रेस, सेना व राष्ट्रवादी कांग्रेसचे अनेक नेत्यांवर आरोप करायचे व ते भाजपमध्ये गेल्यावर गप्प बसायचं असा टोला खासदार सुळे यांनी सोमय्या यांच्या वर लावला. Mp supriya sule
माझ्याजवळ ट्रक भर पुरावे आहे, पण ते त्यांनी सादर का केले नाही याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं.
राज्यात पवार परिवारावर आरोप केले की आरोप करणारा हा प्रसिद्ध होतो, आरोप करणाऱ्यांचा स्वतःची प्रसिद्धी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे.
राजकारणात पवार परिवार यांना टार्गेट केलं की मोठी बातमी बनते व ती प्रसिद्ध ही होते, kirit somayya
मागील 50 वर्षांपासून पवार कुटुंबाला बदनाम करण्याचे काम सुरू आहे, उलटसुलट तथ्यहीन आरोप करायचं व गप्प बसायचं हे उभ्या महाराष्ट्राने बघितले आहे.
खासदार सुळे यांनी आरोप करणाऱ्यांना सल्ला देत "तुम्ही टीका करत रहा, आम्ही जनतेची सेवा करत राहू" असा टोला लगावला. Pawar family
यावेळी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते अशोक जीवतोडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य व राष्ट्रवादी कांग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते
