गडचांदूर :- भोयगाव,गडचांदूर,जिवती रस्ता व गडचांदूर, पाटण,वणी राज्यमार्ग रस्त्याचे लांबीत सुधारणा करण्यासाठी २९ जूलै २०१९ रोजी भूमिपूजन होवून कामाला सुरूवात झाली.५ ते ६ महिन्यांपूर्वी गडचांदूर येथील स्व.राजीव गांधी rajiv gandhi चौक ते माणिकगड सिमेंट कंपनी गेट पर्यंतचा रस्ता खोदण्यात आला.असे असताना मात्र सदर काम बंद पडून आहे.यामुळे नागरिकांना मोठ्याप्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याठिकाणी अपघात accident वाढले असून एकाने जीव सुद्धा गमवला आहे.बंद पडलेले सदर रस्त्याचे काम तातडीने सुरू करून पुर्ण करावे अन्यथा रस्ता रोको करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षातर्फे देण्यात आला होता. मात्र अजुनही काहीच हालचाली दिसत नसल्याने शेवटी दिलेल्या अल्टिमेटम प्रमाणे ४ आक्टोंबर रोजी नियोजित ठिकाणी प्रहारतर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात आला.
हा रस्ता अत्यंत वरदळीचा असून २४ तास याठिकाणी traffic सुरू असते. सदर रस्त्याचे काम बंद पडल्याने नागरिकांना मोठ्याप्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे.माणिकगड सिमेंट Manikgad cement कंपनीत ये-जा करणारे वाहन आणि शहरातील नागरिक याच रस्त्याचा वापर करतात.रस्ता खोदून ठेवल्याने याठिकाणी धुळीचे साम्राज्य पसरले आहे.संबंधित विभाग व कंत्राटदारने नागरिकांना वेठीस धरल्याचे आरोप करत या रस्त्याच्या कामाला सुरूवात करून पुर्ण करावे अशी मागणी प्रहारच्या वतीने करण्यात आली असून निवेदन देऊन आंदोलन समाप्त करण्यात आले.प्रहार जनशक्ती पक्षाचे सतीश बिडकर यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात पंकज माणूसमारे सह अन्य कार्यकर्त्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.