चंद्रपूर - निर्माणाधिन मेडिकल कॉलेजच्या इमारतीला आग लागल्याने येथे काम करत असलेल्या हजारो कामगारांचा राहण्याचा व भोजनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याची तात्काळ दखल घेत येथील कामगारांना शक्य ती मदत करत त्यांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना केल्या आहे. त्यानंतर यंग चांदा ब्रिगेडचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्या वतीने मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. Huge fire at medical college
आज रात्रीच्या सुमारास निर्माणकार्य सुरू असलेल्या नवीन मेडिकल कॉलेजच्या इमारतीला अचानक आग लागली. त्यामूळे येथे काम करत असलेल्या कामगारांच्या जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या आहे. Mla kishor jorgewar सदर कामगार मोठ्या अडचणीत सापडला असून सर्व साधन सामुग्री जळाल्याने त्यांच्या राहण्याचा व भोजनाचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील कामगारांना शक्य ती पूर्ण मदत करण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना दिले आहे. Young chanda brigade तसेच अडचणीत असलेल्या सदर कामगारांच्या भोजनाची व राहण्याची व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना केल्या आहे. सूचना प्राप्त होताच यंग चांदा ब्रिगेडचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्या वतीने मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे पंकज गुप्तां, राजेश वर्मा, परमाहंस यादव, अक्षय मिस्त्री, सुरेंद्र अंचल, शुभम जगताप, दीपक निखार, श्रीकिशन केवट, राकेश निरवटला,चंदभूषण पासे यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडचे इतर कार्यकर्ते घटनास्थळी उपस्थित आहे. Chandrapur medical college fire
