चंद्रपूर - जिल्ह्यातील युवक व युवतीना रोजगार मिळावा यासाठी अनेकजण प्रयत्नशील आहे मात्र काही बेरोजगारांना नोकरी देण्याच्या नावाने फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहे. Chandrapur Police
असाच प्रकार चंद्रपूर जिल्हा परिषद व नुकतेच चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रात उघड आला, बेरोजगारांना नोकरी देण्याचे आमिष दाखवीत त्यांना लुटणारी टोळी सक्रिय झाली आहे, युवकांनी अश्या बोगस वृत्तीपासून सावध रहावे असे आवाहन सुद्धा प्रशासनाने केले आहे.
काही दिवसांपूर्वी चंद्रपूर पोलीस व SIS इंडिया सिक्युरिटी द्वारे जिल्ह्यातील 300 बेरोजगारांना रोजगार भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती.
त्या रोजगार भरतीवर चंद्रपूर जिल्हा पोलिस प्रशासनाने खुलासा करीत स्पष्ट केले आहे की जिल्हा पोलिस प्रशासचा त्या रोजगार भरतीशी काही संबंध नाही मात्र जिल्ह्यातील युवक व युवतीना रोजगार Employment मिळावा हा एकमेव उद्देश प्रशासनाचा आहे असे पोलीस प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
सदर भरती प्रक्रिया ही शासनाच्या कोणत्याही विभागाशी संबंधीत नसुन केवळ खाजगी कंपनीमार्फत राबविली जाणारी भरती प्रक्रिया आहे . सदर भरती प्रक्रिया ही पोलीस स्टेशनच्या आवारात होणार नाही. याबाबत संबंधीतांनी नोंद घ्यावी.