चंद्रपूर/वरोरा - 2 महिन्यांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वे अधिकाऱ्याला 2 लाखांची लाच घेताना नागपूर CBI च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली होती.
त्या प्रकरणाला 2 महिने उलटत नाही पुन्हा एका रेल्वेच्या महिला अधिकाऱ्याला CBI च्या लाचलुचपत विभागाने अटक केली आहे
2 वर्षांपूर्वी रेल्वे विभागाने गैर कायदेशीर पद्धतीने ID बनवून रेल्वे तिकीट काढण्याचा धंदा सुरू केला होता, त्यावेळी रेल्वे विभागाने अनेकांना या प्रकरणी अटक सुद्धा केली होती, अशीच एक कारवाई ऑगस्ट महिन्यात भद्रावती येथे झाली, भद्रावती येथील CYBER SPACE Computer Net Cafe
च्या संचालकाने एका प्रवाश्याला बनावट Id ने रेल्वेचे तिकीट काढून दिले होते, सदर बाब रेल्वे पोलिसांना कळली व तात्काळ त्यांनी त्या सायबर कॅफे वर कारवाई केली. CBI Raid
सायबर कॅफेच्या संचालकाने प्रकरण मिटवावे यासाठी रेल्वे पोलीस उपनिरीक्षक गोपिका मानकर यांना विनंती केली, मात्र मानकर यांनी प्रकरण मिटविण्यासाठी फिर्यादीला 1 लाख रुपयांची मागणी केली.
तडजोडीअंती 60 हजार रुपये देण्याचे ठरले, तक्रार कर्त्याने याबाबत केंद्रीय लाचलुचपत प्रतिबंध नागपूर यांच्याकडे तक्रार केली त्यानुसार वरोरा रेल्वे स्थानकावर 13 ऑक्टोबर रोजी सापळा रचण्यात आला रात्रीच्या सुमारास 60 हजार रुपयाची लाच घेताना रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक गोपिका मानकर यांना रंगेहात त्यांच्या कार्यालयात पकडण्यात आले सदरची कारवाई नागपूर येथील केंद्रीय लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस अधीक्षक एम एस खान यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी एस्सार चौगुले पोलीस निरीक्षक कल्याणी हुमणे पोलीस निरीक्षक निरज गुप्ता कविता ला सरकर उपनिरीक्षक विनोद कराळे कोमल गुजरकर संदीप ढोबळे सीएम बांगडकर कीर्ती बावनकुळे राजेश डेकाटे आदींनी केली.
