प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - संपूर्ण मूल तालुका हा जंगल व्याप्त असून जंगल शेजारीच असंख्य शेतकऱ्यांची शेती आहे. शेतीत काम केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही.आणि गुरे चराईसाठी जंगलाशिवाय दुसरी जागाच शिल्लक नाही अशा प्रसंगी गुराख्याला गुरे चारण्यासाठी न्यावे लागते.त्यामुळे वाघाने ठार केल्याच्या घटना घडत आहेत.
मुल पासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचोली येथील गुराखी राजेंद्र नामदेव ठाकरे वय (४४)हा नेहमी प्रमाणे बैलांना घेऊन जंगल शेजारी चराईसाठी गेला असता दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला करुन राजेंद्र ठाकरे यांना जागीच ठार केले. मृतकांस पत्नी,२ मुली, १ मुलगा असा परिवार आहे. कर्ता व्यक्ती गेल्याने ठाकरेंचा कुटुंब पोरका व निराधार झाला.
याबाबतची माहिती कांग्रेसचे नेते CDCC बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या लक्षात आणून देताच धानोरकर यांनी लगेच दुसऱ्या दिवशी चिंचोली येथे राजेंद्र ठाकरे यांच्या घरी प्रत्यक्ष सांत्वन भेट दिली.CDCC बँकेच्या शेतकरी कल्याण निधीमधून Farmers Welfare Fund तात्काळ दहा हजाराची मदत चेकद्वारे मृतकाची पत्नी श्रीमती वैशाली राजेंद्र ठाकरे यांना खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या हस्ते सुपूर्द केला. व वरिष्ठ वन अधिकारी यांचेशी त्वरित फोनवर बोलून घरातील कमवता व्यक्ती गेला तर संपूर्ण कुटुंब निराधार होतो,अशा प्रसंगी वनविभागाने मृतक कुटुंबियांच्या पाल्याला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार वनखात्याच्या नौकरीत सामावून घ्यावे अशी सूचना भेटी प्रसंगी केली.
याप्रसंगी CDCC बँकेचे अध्यक्ष माजी जि.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत, तालुका कांग्रेसचे अध्यक्ष तथा बाजार समिती सभापती घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राजेश रत्नवार,विनोद मत्ते, संचालक राजेंद्र कन्नमवार, राजू पाटील मारकवार, किशोर घडसे, गुरु गुरनुले, सुरेश फुलझेले, करवन सरपंच वंदना पेंदाम,माजी सरपंच साईनाथ मंगाम, मनोज ठाकरे,कोसंबी सरपंच रवींद्र कामडी, मारोडा अशोक पुलावार,राजेश्वर मुडावार, बंडू लोहट, जगदीश चचाने, संदीप मोहबे, यांचेसह गावातील नागरिक व कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
