चंद्रपूर - चंद्रपूर येथील ऐतिहासिक गोंड़कालीन रामाळा तलाव प्रदूषणमुक्त करणे, त्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी खोलीकरण व स्वच्छतेच्या कामांना गती देण्याची सूचना मुंबई येथील बैठकीत आदित्यसाहेब ठाकरे, मंत्री, पर्यावरण व पर्यटन Tourism यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
Aditya Thakrey
सहयाद्री sahyadri अतिथीगृह मुंबई येथे आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पर्यावरण विभाग च्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, महेश पाठक, प्रधान सचिव, नगर्ज विकास, श्री. मिलिंद बोरिकर, विभागीय व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन वीकास मंडळ, अशोक शिंगाळे, सदस्य सचिव, डॉ व्ही एम मोटघरे, जॉइन डारेक्टर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे उपस्थित होते. चंद्रपूरहुन वीडियो कान्फरेन्स द्वारा अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, राजेश मोहिते, आयुक्त, चंद्रपूर मनपा, व संबधित अधिकारी उपस्थीत होते.
यावेळी रामाळा तलाव खोलिकरण चे लवकर सुरु करण्याच्या सूचना दिल्या, तलावाच्या खोलिकरण च्या खर्चास खनिज वीकास निधी मधुन मंजूरी दिल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. तसेच तलावातील प्रदूषणास कारणीभूत सांडपाणी शुद्धिकरण करण्यास सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प-एसटीपी चे बांधकाम प्रस्तावास मंजूरी देण्याचे, तलावातील अतिक्रमण थांबवीण्याचे दृष्टिने महत्वाची संरक्षण भिंत, तलावातील उद्यानात जाण्यास दुसऱ्या बाजूने प्रस्तावित पुलाचे बांधकाम संदर्भात सूचना यावेळी श्री आदित्य ठाकरे यांनी दिल्या.
Ramala Lake chandrapur
रामाळा तलाव संवर्धनाचे कार्य येत्या काळात राज्यातील इतर शहरातील सांड़पाणी व इतर कारणामुळे प्रदूषित आणि अतिक्रमण होत चाललेल्या शहरी तलावाकरिता पथदर्शक ठरू शकेल, पर्यावरण विभागाने सुरु केलेले "माझी वसुंधरा अभियान" My Earth Expedition एकंदरित पर्यावरण रक्षणाच्या दृष्टिने महत्वाचे असून यास नक्कीच बळकटी येईल असे मत बंडू धोतरे यांनी व्यक्त केले.
