चंद्रपूर - चंद्रपूर शहरातील पंचशील चौक येथे 14 ऑक्टोबरला मध्यरात्रीच्या दरम्यान व्यसनाधीन तरुणांनी ट्रॅव्हलर The Burning Traveller गाडी जाळली आहे. नशेच्या धुंदीत असलेल्या तरुणांसोबत झालेल्या वादातून हा प्रकार घडला आहे. पंचशील चौक परिसरातील नागरिकांना इथे असलेल्या काही व्यसनाधीन तरुणाचा त्रास होत असून रोज वेगवेगळ्या घटना घडत आहे. असा आरोप परिसरातील नागरिकांचा आहे. व्यसनाधीन असलेले हे मुलं गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून या अशा गुन्हेगारी Criminal प्रवृत्तीच्या मुलांना तात्काळ तडीपार Tadipar करण्यात यावी अशी मागणी देखील पंचशील चौकातील नागरिकांची आहे. शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
जिल्ह्याची दारूबंदी उठताच चंद्रपुरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, लहान वाद आज उग्र रूप धारण करीत असून, बंदुका, तलवारी हे शस्त्र सहज कुणावरही उगारले जात आहे, अश्या गुन्हेगारी वृत्तीना जिल्ह्यातून हद्दपार करायला हवे अशी मागणी जनसामान्य नागरिक करीत आहे.
