प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - 14 ऑक्टोम्बरला रेल्वे लाईन ट्रॅक वर 23 वर्षीय युवकाचा धडा वेगळा मृतदेह आढळला होता, मृतदेहाची ओळख पटण्यासाठी समाज माध्यमांवर शरद मृतकांच्या मृतदेहाचा फोटो व्हायरल केला.
आज त्या मृतकाची ओळख पटली असून तो शिवाजी वार्ड, क्रीडा मंडळ जवळील राहणारा 23 वर्षीय अजय गणेश वेलादी असे आहे. Railway Track
5 महिन्यांपूर्वी अजय ची आई मरण पावली होती त्यामुळे त्याला दारूचे अति व्यसनाने ग्रासले होते.
दोन दिवसांपूर्वी अजय ने कोरोना लस सुद्धा घेतली होती. Suicide
त्यानंतरही तो दारू पीत असल्याने अजय च्या मोठ्या भावाने त्याला दारू पिऊ नको असे हटकले असता अजय रागाच्या भरात घरून निघून गेला.
त्यानंतर त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅक वर धडा वेगळा आढळून आला. त्याने दारूच्या नशेत आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
बल्लारपूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत पुढील तपास करीत आहे.
