चंद्रपूर - वन संपदेने व्यापलेला चंद्रपूर जिल्हा, या जिल्ह्यात वन्य-मानवी संघर्ष खूप जुना आहे, वन्य प्राण्यांच्या क्षेत्रात मानवी जीवनाचा वावर होत आहे, अश्यातच हल्ल्याचा हा संघर्ष वाढत आहे.
26 जुलैला पायली भटाळी निवासी 61 वर्षीय सुरेश खिरटकर यांच्या वर अस्वलीने हल्ला केला होता, या हल्ल्यात त्यांचा चेहरा, डोळे व कवटीला गंभीर इजा झाली होती.
हल्ल्यानंतर त्यांना चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते, मात्र CT SCAN मशीन बंद असल्याने त्यांना नागपूर च्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
काही दिवसानंतर खिरटकर पुन्हा चंद्रपूरच्या रुग्णालयात आले असता नेत्र विभागाने त्यांच्या डोळ्यांची तपासणी केली असता त्यांना कायमस्वरूपी अंधत्व आले असल्याचे नमूद केले.
त्यासंदर्भात जेव्हा खिरटकर हे कायम अंधत्व बद्दल वैधकीय प्रमाणपत्रासाठी डॉ.भास्कर सोनारकर यांचेकडे गेले असता त्यांनी तुमचा उपचार नागरपूरला झाला आहे तर तिथूनच तुम्ही प्रमाणपत्र घ्या असे सांगितले. Medical Certificate
शहानिशा न करता डॉ. सोनारकर यांनी हात वर करत आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला, नंतर खिरटकर यांनी डॉ. अभिलाषा गावतुरे यांचेशी सम्पर्क साधला, डॉ. गावतुरे यांनी याबाबत वैधकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता Deen डॉ. नितनवरे यांना वैधकीय प्रमाणपत्र बद्दल असे काही नियम आहे का? व घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला.
डॉ. नितनवरे यांनी ताबडतोब खिरटकर यांना वैधकीय प्रमाणपत्र जारी करण्याचे निर्देश दिले.
खिरटकर जेव्हा परत डॉ. सोनारकर यांचेकडे गेले असता त्यांनी टाळाटाळ करीत त्यांच्या प्रमाणपत्रावर कायम अंधत्व हा शब्द वगळला, त्यामुळे वनविभागातर्फे मिळणाऱ्या मोबदल्याचा लाभ खिरटकर यांना मिळाला नाही.
डॉ. सोनारकर हे अनेक वर्षांपासून वैधकीय महाविद्यालयात आपली सेवा देत आहे, त्यांच्या कार्यकाळात अनेकांनी त्यांच्या तक्रारी सुद्धा केल्या मात्र त्यांच्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही.
मागील वर्षी त्याची बदली वरोरा येथे करण्यात आली होती मात्र ते त्या ठिकाणी रुजू झालेच नाही, त्यांच्या तक्रारी जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार व आमदार यांच्या कानावर सुद्धा पोहचली मात्र कारवाई करण्याची हिंमत कुणी दाखवीत नाही. अनेक दिवसांपासून वैधकीय महाविद्यालयात डॉ. सोनारकर हे रुग्णांची हेळसांड करीत असल्याचा आरोप भूमिपुत्र ब्रिगेड संघटनेने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे.
याबाबत डॉ. सोनारकर यांचेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
अश्या बेजबाबदार व गोर गरीब रुग्णांना नेहमी त्रास देणाऱ्या डॉ. सोनारकर यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी भूमिपुत्र ब्रिगेडच्या वतीने डॉ. अभिलाषा गावतुरे व जिल्हाध्यक्ष विवेक बोरीकर यांनी केली आहे.
